‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम घराघरात लोकप्रिय आहे. या शोमधून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे शिवाली परब. अभिनयाच्या जोरावर शिवालीने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. सध्या ती एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे.

उत्तम अभिनय व विनोदाचं अचूक टायमिंग साधत शिवाली प्रेक्षकांना खळखळवून हसवते. शिवाली परबचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. तिच्या आयुष्यात काय सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते नेहमीच खूप उत्सुक असतात. शिवालीदेखील सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते.
आणखी वाचा : “नितीन देसाईंची घटना, राजकारण्यानी बुडवलेले पैसे अन्…”, प्रसिद्ध मराठी सेलिब्रेटी फोटोग्राफरच्या जिवाला धोका, म्हणाला “त्याच्याबद्दल काही पुरावे…”

नुकतंच शिवालीने एका रेडिओ चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला एका मिनिटात काही प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांची तिने मजेशीररित्या उत्तर दिले.

आणखी वाचा : अक्षय कुमारच्या ‘ओह माय गॉड २’ चित्रपटाबद्दल शरद पोंक्षेंची प्रतिक्रिया, म्हणाले… 

यावेळी “तिला तुझ्याबद्दलची एक अफवा कोणती असेल, जी तुला पसरवायला आवडेल?”, असा प्रश्न तिला विचारण्यात आला. यावर तिने “मला खूप बॉयफ्रेंड्स आहेत”, असे शिवालीने सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान शिवालीने काही दिवसांपूर्वीच शाहरुख खानवर तिचं क्रश आहे, असे सांगितले होते. तसेच शाहरुख मला प्रचंड आवडतो, असं म्हणत त्याला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती.