‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम घराघरात पाहिला जातो. या कार्यक्रमातील हास्यवीर प्रेक्षकांना खळखळवून हसवतात. दत्तू मोरे ही हास्यजत्रेतून घराघरात पोहोचला. विनोदाचं अचूक टायमिंग साधत दत्तू प्रेक्षकांना खळखळवून हसवतो. दत्तू मोरे नुकताच विवाहबंधनात अडकला आहे.

दत्तूने गुपचूप लग्न उरकलं आहे. मंगळवारी(२३ मे) दत्तूने स्वाती घुनागे हिच्यासह लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. ‘फ्रेम फायर स्टुडिओ’ या इन्स्टाग्राम पेजवरुन दत्तूचे काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. दत्तूने पत्नीसह प्री वेडिंग फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये दत्तूने त्याच्या पत्नीसह पोझ दिल्याचं पाहायला मिळत आहे. या फोटोला त्यांनी “जस्ट मॅरीड” असं कॅप्शन दिलं आहे.

View this post on Instagram

A post shared by FRAMEFIRE STUDIO (@framefirestudio)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दत्तूचे प्री वेडिंग फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोवर कलाकार व चाहत्यांनी कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.