छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातील हास्यवीर प्रेक्षकांना खळखळून हसवतात. अनेक कलाकारांना याच कार्यक्रमातून प्रसिद्धी मिळाली. विनोदवीर गौरव मोरेही हास्यजत्रेतून घराघरात पोहोचला.

अफलातून शैली व विनोदाचं अचूक टायमिंग साधत गौरव प्रेक्षकांचं मनोरंजन करतो. प्रेक्षकांना पोट धरुन हसवायला भाग पाडणाऱ्या गौरवचा चाहता वर्ग मोठा आहे. अनेकदा कामाची पोचपावती कलाकारांना प्रेक्षकांकडून मिळत असते. गौरवच्या कामाचंही एका चाहत्याने कौतुक केलं आहे. गौरवच्या चाहत्याने त्याला इन्स्टाग्रामवर मेसेज केला आहे.

हेही वाचा>>Video: नवरा असावा तर असा! रितेश देशमुखने जिनिलीयासाठी घेतला खास उखाणा

“हॅलो सर, मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. मेडिकलमध्ये १२ तास काम करुन मी घरी येतो, तेव्हा आयुष्य खूप कंटाळवाणं वाटतं. कधी कधी कधी आयुष्य संपवून टाकावं असं वाटतं. पण रात्री टीव्हीवर जेव्हा तुमचे हास्यजत्रेचे एपिसोड बघतो, तेव्हा मी खूप हसतो. तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात. तुमचं काम खूप कठीण आहे. माझ्यासाठी तुम्ही जीवनदाता आहात”, असं त्याने मेसेजमध्ये लिहिलं आहे. पुढे त्याने गौरव मोरेचे स्किटमधील डायलॉगही लिहिले आहेत. “खूप प्रेम सर, टानानाना, मरतो का काय मी, फ्रेश, जाम बेकार क्रिएटिव्हिटी, तुमच्या हिंदी शायरी म्हणजे…थॅंक्यू सर लव्ह यू”, असं त्याने म्हटलं आहे.

हेही वाचा>>…म्हणून ‘शार्क टँक’ फेम अश्नीर ग्रोवरने जाहिरातीसाठी विराट-अनुष्का दिला नकार

gaurav more

हेही वाचा>>आर्यन खान करतोय नोरा फतेहीला डेट? दुबईतील व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गौरव मोरेने चाहत्याच्या या मेसेजचा फोटो त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे. थॅंक्यू असं कॅप्शन त्याने स्टोरीला दिलं आहे. गौरव मराठी चित्रपटातूनही प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.