पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी(२८ मे) नव्या संसद भवनाचं उद्घाटन केलं. एकीकडे उद्घाटन सुरू असताना दुसरीकडे मात्र आंदोलन करणारे कुस्तीगीर व दिल्ली पोलिसांमध्ये झटापट झाली. यात दिल्ली पोलिसांनी साक्षी मलिक, विनेश फोगाट, बजरंग पुनियासह अन्य कुस्तीपटूंना ताब्यात घेतलं. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिल्लीत कुस्तीपटू व पोलिसांमध्ये झालेल्या झटापटीनंतर अनेक राजकीय नेत्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर मनोरंजन विश्वातील सेलिब्रिटीही यावर व्यक्त होताना दिसत आहेत. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरातनेही याबाबत पोस्ट शेअर करत खेद व्यक्त केला आहे.

हेही वाचा>> “आज माझी वेळ आहे, उद्या…”, कुस्तीपटू व पोलिसांमधील झटापटीनंतर विजेंदर सिंगचं ट्वीट, बॉलिवूड अभिनेता म्हणाला, “एकदम…”

वनिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन स्टोरी शेअर केली आहे. दिल्ली पोलीस व कुस्तीगीरांच्या झटापटीदरम्यानचे फोटो वनिताने इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केले आहेत. ही स्टोरी शेअर करताना तिने दु:ख व निशब्द व्यक्त करणारे इमोजीही पोस्ट केले आहेत.

नेमकं प्रकरण काय?

गेल्या महिनाभरापासून कुस्तीपटू दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर आंदोलन करत आहेत. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्या अटकेच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. नव्या संसद भवनाच्या बाहेर कुस्तीपटूंनी ‘महापंचायत’ असल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार कुस्तीपटू नव्या संसद भवनाकडे निघाले होते. तेव्हा कुस्तीपटू व दिल्ली पोलिसांमध्ये झटापट झाली.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasyajatra fame vanita kharat reacted on delhi police detained wrestler sakshi malik vinesh phogat kak
First published on: 29-05-2023 at 13:32 IST