शाहरुख खानचा ‘जवान’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अजूनही जोरदार कमाई करत आहे. दाक्षिणात्य तडका असलेल्या या चित्रपटाची क्रेझ अजूनही पाहायला मिळत आहेत. एवढंच नाहीतर ‘जवान’ चित्रपट हिंदीसह दाक्षिणात्य चित्रपटांना टक्कर देताना दिसत आहे. शाहरुख खानच्या या धमाकेदार चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ६३७.२३ कोटींची कमाई केली आहे.

‘जवान’ चित्रपटातील शाहरुख खानचा लूक आणि गाणी अजून सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत. कोणी शाहरुख सारखा टक्कलचा लूक रिक्रिएट करून रील करताना दिसत आहेत, तर कोणी ‘जवान’ चित्रपटातील गाण्यावर जबरदस्त डान्स करत आहे. असाच जबरदस्त डान्स अभिनेता अजिंक्य राऊतने केला आहे.

हेही वाचा – Video: प्रसाद ओक स्वप्नील जोशीला देत होता वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, पण घडलं भलतंच, पाहा व्हिडीओ

‘विठू माऊली’, ‘मन उडू उडू झालं’ या मालिकांमधून घराघरात पोहोचलेला अजिंक्यने नुकताच सोशल मीडियावर एक रील शेअर केला आहे. या रीलमध्ये तो ‘जवान’ चित्रपटातील ‘चलेया’ या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना पाहायला मिळत आहे. “मी असे मजेशीर रील्स करू का?” असं त्याने या रीलला कॅप्शन दिलं आहे.

हेही वाचा – “दुर्दैवाने होतं ते…” ‘विनाकारण राजकारण’साठी पुरस्कार मिळाल्यानंतर रुपाली भोसले असं का म्हणाली?

हेही वाचा – वडील होते सुपरस्टार, आई आहे प्रसिद्ध अभिनेत्री; ‘या’ चिमुकलीला ओळखलंत का?

अजिंक्यच्या या रीलवर त्याच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘क्या बात है’, ‘नक्कीच तू अशा रील्स कर. कारण तू खूप छान डान्स करतो. तसंच तू डान्स करताना खूप कमी दिसतोस, त्यामुळे तुझा डान्स बघायला नक्कीच आवडेल’, ‘डान्स करत राहा. अजून बघायला आवडेल,’ अशा प्रतिक्रिया अजिंक्यच्या चाहत्यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा – खलनायिकेची भूमिका साकारल्यामुळे कधी प्रेक्षकांचा वाईट अनुभव आला का? रुपाली भोसले म्हणाली, “मला खूप….”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सध्या अजिंक्य ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ पाहायला मिळत आहे. या मालिकेत त्याने राजवीरची भूमिका साकारली आहे. या मालिकेतील अजिंक्यच्या भूमिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.