अभिनेता विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांना मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडपं म्हणून ओळखलं जातं. त्या दोघांनी अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर ३ मे २०२२ रोजी लग्नगाठ बांधली. विराजस आणि शिवानी हे गेल्या कित्येक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर त्या दोघांनी आयुष्यभरासाठी एकमेकांची निवड केली. आता विराजसने शिवानीबरोबर लग्न करण्यामागचे कारण सांगितले आहे.

विराजस कुलकर्णी हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी एनिथिंग’ हे सेशन घेतलं. यावेळी त्याने ‘विचारा बोलूया’ असं सांगत चाहत्यांना प्रश्न विचारण्याचे आवाहन केले. त्याच्या या आवाहनाला चाहत्यांनीही चांगला प्रतिसाद दिला.
आणखी वाचा : “लग्नानंतरचा पहिला…” विराजस कुलकर्णीने सांगितला शिवानीसाठी आखलेला ‘व्हॅलेंटाईन डे’चा खास प्लॅन

यावेळी विराजसला त्याची पत्नी शिवानीबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले. ‘तुझ्या पत्नीबद्दल काय सांगशील?’, असे एका चाहत्याने त्याला विचारले होते. त्यावर त्याने “मला तिचा खूप खूप अभिमान वाटतो. तिची नवी मालिका सुरु होत आहे. झी मराठी वाहिनीवर ‘तुला शिकवीन चागंलाच धडा’ हे तिच्या मालिकेचं नाव आहे”, असे म्हटले.

virajas kulkarni 1
विराजस कुलकर्णीचे चाहत्याला उत्तर

त्यानंतर एकाने ‘तुझी क्रश कोण?’ असा प्रश्न त्याला विचारला. त्यावर त्याने शिवानी रांगोळेचा फोटो शेअर करत “आहे एक…” असं सांगितले.

आणखी वाचा : “…त्यादिवशीही मला शूटींगला आल्यासारखं वाटत होतं”, विराजसने सांगितला लग्नादरम्यानचा ‘तो’ किस्सा

virajas kulkarni 2
विराजस कुलकर्णीचे चाहत्याला उत्तर

यानंतर एका चाहत्याने ‘तुला शिवानीमधील सर्वाधिक आवडलेली गोष्ट कोणती?’, असा प्रश्न केला. त्यावर उत्तर देताना विराजसने थेट शिवानीशी लग्न करण्यामागचे कारण सांगितले. “मला सगळंच आवडतं…म्हणूनच लग्न केलं ना!” असे विराजस यावेळी म्हणाला. त्याच्या या उत्तराने त्याने चाहत्यांचे मनंही जिंकून घेतले.

virajas kulkarni 3
विराजस कुलकर्णीचे चाहत्याला उत्तर

आणखी वाचा : “विराजसशी लग्न झाल्यावर…” शिवानी रांगोळे सासूला कोणत्या नावाने हाक मारते? स्वत:च केला खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान शिवानी रांगोळे ही लवकरच एका नव्या मालिकेत झळकणार आहे. झी मराठी वाहिनीवर लवकरच ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका प्रसारित होणार आहे. नुकताच याचा प्रोमो समोर आला आहे. या मालिकेत शिवानी ही अक्षरा ही भूमिका साकारताना दिसत आहे. लग्नानंतर शिवानीची ही पहिलीच मालिका आहे. तर विराजस हा ‘सुभेदार’ या चित्रपटात झळकणार आहे. त्याच्या या चित्रपटातील भूमिकेबद्दल जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत.