Amruta Malwadkar Wedding : यंदाच्या वर्षी अनेक मराठी कलाकार लग्नबंधनात अडकल्याचं पाहायला मिळालं. काही दिवसांपूर्वीच लोकप्रिय अभिनेत्री एतशा संझगिरी व अभिनेता निषाद भोईर यांचा साखरपुडा थाटामाटात पार पडला. या पाठोपाठ आता मराठी मनोरंजनविश्वातील आणखी एका अभिनेत्रीने सर्वांना लग्नाबद्दलची आनंदाची बातमी दिली आहे. ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत झळकलेली ही अभिनेत्री नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

‘कोण होतीस तू काय झालीस तू’ या लोकप्रिय मालिकेत झळकलेली अभिनेत्री अमृता माळवदकर नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. तिच्या लग्नसोहळ्यातील सुंदर फोटो अमृताचे मित्रमंडळी आणि जवळच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अमृता माळवदकरने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या प्रसिद्ध कार्यक्रमाचा लेखक विनायक पुरुषोत्तमशी लग्न केलं आहे. या दोघांच्या लग्नाला मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते. निखिल बने, निरंजन जोशी, स्वानंदी बेर्डे, निमिष कुलकर्णी, आकांशा गाडे असे बरेच कलाकार अमृता- विनायकच्या हळदीला व लग्नसोहळ्याला उपस्थित होते. या विवाहसोहळ्यातील सुंदर फोटो सध्या सर्वत्र व्हायरल होत आहेत.

विनायक आणि अमृताने लग्न लागताना पारंपरिक लूक केला होता. सुंदर लाल रंगाची साडी, नाकात नथ, हातात हिरवा चुडा, गळ्यात नाजूक हार या लूकमध्ये अमृता फारच सुंदर दिसत होती. तर, विनायकने लग्न लागताना ऑफ व्हाइट रंगाचा सदरा घातला होता. विनायक व अमृताचे लग्नसोहळ्यातील गोड फोटो अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Amruta Malwadkar Wedding
Amruta Malwadkar Wedding – अमृता माळवदकर अडकली लग्नबंधनात
amruta
Amruta Malwadkar Wedding – अमृता माळवदकरच्या लग्नाला मराठी कलाकारांची मांदियाळी

दरम्यान, अमृता व विनायक यांच्यावर संपूर्ण मराठी मनोरंजन विश्वातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. या दोघांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, अमृता आजवर अनेक मालिकांमध्ये झळकली आहे. तर, विनायक पुरुषोत्तमला हास्यजत्रेमुळे घराघरांत एक वेगळी ओळख मिळाली.