"त्यात आक्षेप घेण्यासारखं काय?" महेश मांजरेकरांबद्दलच्या 'त्या' प्रश्नावर अपूर्वा नेमळेकरचे उत्तर | Marathi Actress Apurva Nemlekar reply about why she said mr mahesh manjrekar in bigg boss house nrp 97 | Loksatta

“त्यात आक्षेप घेण्यासारखं काय?” महेश मांजरेकरांबद्दलच्या ‘त्या’ प्रश्नावर अपूर्वा नेमळेकरचे उत्तर

अपूर्वाने बिग बॉसचे होस्ट महेश मांजरेकरांबद्दल एका नेटकऱ्याने विचारलेल्या प्रश्नाला सडेतोड उत्तर दिले आहे.

“त्यात आक्षेप घेण्यासारखं काय?” महेश मांजरेकरांबद्दलच्या ‘त्या’ प्रश्नावर अपूर्वा नेमळेकरचे उत्तर
अपूर्वा नेमळेकर महेश मांजरेकर

छोट्या पडद्यावर सर्वाधिक चर्चेत असलेला शो म्हणून बिग बॉस या कार्यक्रमाकडे पाहिले जाते. बिग बॉस या कार्यक्रमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या कार्यक्रमात सर्वाधिक चर्चेत आलेली अभिनेत्री म्हणून अपूर्वा नेमळेकरला ओळखले जाते. अपूर्वा नेमळेकर ही बिग बॉसमुळे प्रसिद्धीझोतात आली. ती कायमच चर्चेत असते. नुकतंच अपूर्वाने बिग बॉसचे होस्ट महेश मांजरेकरांबद्दल एका नेटकऱ्याने विचारलेल्या प्रश्नाला सडेतोड उत्तर दिले आहे.

बिग बॉसच्या घरात विकेंडचा भाग कायमच खास असतो. बिग बॉसच्या विकेंडच्या भागात महेश मांजरेकर चावडीवर घरातील सदस्यांची शाळा घेताना दिसतात. गेले काही दिवस महेश मांजरेकर हे अपूर्वा नेमळेकरला तिच्या आवाजावरुन ओरडताना दिसतात. विशेष म्हणजे अपूर्वाही महेश मांजरेकरांच्या प्रत्येक प्रश्नाला त्याच पद्धतीने उत्तर देतानाही दिसते. काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या घरात रंगलेल्या चावडीवरुन एका नेटकऱ्याने अपूर्वा नेमळेकरला प्रश्न विचारला आहे.
आणखी वाचा : प्रेम, लग्न, घटस्फोट; ‘बिग बॉस’मुळे चर्चेत असलेल्या अपूर्वा नेमळेकरच्या खासगी आयुष्याबद्दल माहितीये का?

‘मला एक कळत नाहीये ती अपूर्वा नेमळेकर महेश मांजरेकरांना मिस्टर. मांजरेकर का म्हणते? समोर तर सर म्हणते’, असा प्रश्न एका नेटकऱ्याने विचारला होता. त्यावर अपूर्वाने चांगल्याच पद्धतीने उत्तर दिले आहे.

“कोणाच्याही नावापुढे MR जोडणे हे अनादर किंवा अपमानकारक नाही. त्याउलट अपूर्वा नेमळेकर ही महेश मांजरेकरांना किंवा एखाद्याला आदराने बोलते. तिची ती एक पद्धत आहे. आपण एखादा फॉर्म भरतो त्यावरही Mr/Ms/Mrs हे असतंच. त्यामुळे त्यात आक्षेप घेण्यासारखं काय आहे?” असा प्रश्न अपूर्वा नेमळेकरने त्या नेटकऱ्याला विचारला आहे.

आणखी वाचा : शिवसेनेचा पदाधिकारी, ८ वर्षांचे रिलेशन आणि घटस्फोट, जाणून घ्या अपूर्वा नेमळेकरच्या पूर्वाश्रमीच्या पतीबद्दल…

दरम्यान अपूर्वा नेमळेकरची ‘आभास हा’ ही पहिली मालिका होते. त्याबरोबर ‘ती एका पेक्षा एक जोडीचा मामला’ यामध्येही झळकली होती. तिची ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका चांगलीच गाजली. या मालिकेच्या दोन्हीही भागात तिने काम केले. तिने ‘आराधना’ या मालिकेतही काम केले होते. त्याबरोबर ‘तू माझा सांगती’ या मालिकेतही तिने उत्तम काम केले आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 18:02 IST
Next Story
Video : राणादा-पाठकबाईंच्या घरी सत्यनारायणाची पूजा, नवविवाहित जोडप्याच्या साधेपणाची व्हिडीओमध्ये दिसली झलक