छोट्या पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणून धनश्री काडगावकरला ओळखले जाते. धनश्रीने ‘तुझ्यात जीव रंगला’मध्ये नंदिता गायकवाड म्हणजे वहिनीसाहेबांची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर आता धनश्री ही तू चाल पुढं या मालिकेत झळकत आहे. धनश्री तिच्या करिअरबरोबरच वैयक्तिक आयुष्यातही भरारी घेताना दिसत आहे. नुकतंच अभिनेत्री धनश्री काडगावकरने नवीन घर खरेदी केलं आहे.

धनश्रीने नुकतंच इन्स्टाग्रामवर दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. यातील पहिल्या पोस्टमध्ये तिने काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती घराची चावी पकडून उभी असल्याचे दिसत आहे. तसेच तिचा नवरा आणि लहान मुलगाही या फोटोंमध्ये दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देताना तिने “नवीन घर, स्वप्न खरी होतात” असे म्हटले आहे.

त्याबरोबरच धनश्रीने तिच्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडीओही शेअर केला आहे. या व्हिडीओत तिने तिच्या घराची संपूर्ण सफर घडवली आहे. यावेळी ती म्हणाली, “मी दोन वर्षांपूर्वी गणेश चतुर्थीच्या दिवशी युट्यूब चॅनल सुरु केले होते. त्यानंतर आता बाप्पा आपल्यासोबत असताना त्याच्या कृपेने माझ्या आयुष्यात एक फार चांगली गोष्ट घडली आहे. माझं हे स्वप्न होतं आणि ते आज पूर्ण झालं आहे.”

धनश्री शेअर केलेल्या या व्हिडीओत तिने दोन नवीन घरं खरेदी केल्याचे पाहायला मिळत आहे. ठाणे पश्चिम या ठिकाणी तिने एक वन बीएचके आणि दुसरा टू बीएचके अशी दोन घरं खरेदी केली आहेत. तिच्या या गुडन्यूजनंतर अनेक कलाकार तिचे अभिनंदन करताना दिसत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Dhanooo (@adorable_dhanashrikadgaonkar)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान धनश्री ही सध्या तू चाल पुढे या मालिकेत झळकत आहे. या मालिकेत ती शिल्पी हे पात्र साकारत आहे. धनश्रीने काही महिन्यांपूर्वी मोठ्या ब्रेकनंतर पुनरागमन केले. काही महिन्यांपूर्वी तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. धनश्रीने तिच्या बाळाचे नाव कबीर असे ठेवले आहे.