‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातील प्रत्येक कलाकारांनी आपल्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं आहे. या कार्यक्रमामुळे नवोदित कलाकारांना नवी ओळख मिळाली असून आता ते रुपेरी पडद्यावर देखील पाहायला मिळत आहे. यापैकीच एक म्हणजे निखिल बने. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून नावारुपाला आलेला निखिल ‘बॉईज ४’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. २० ऑक्टोबरला त्याचा हा पहिला चित्रपट प्रदर्शित होत आहे.

सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतिक लाड, अभिनय बेर्डे, गौरव मोरे या मंडळींमध्ये निखिल बने पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सध्या तो ‘बॉईज ४’ या चित्रपटाच प्रमोशन करताना दिसत आहे. अशातच त्याने एक फॅन मुमेंट सांगितली आहे. ज्यामधून मराठी सिनेसृष्टीतील एक आघाडीची अभिनेत्री त्याची मोठी चाहती असल्याचं समोर आलं आहे.

हेही वाचा – Video: सुबोध भावेच्या ‘मानापमान’ संगीतमय चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात, व्हिडीओ शेअर अभिनेता म्हणाला…

हेही वाचा – “केस कापणे हा सुद्धा एक टास्क….”, ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळी असं का म्हणाले?

निखिल बनेची ही मोठी चाहती अभिनेत्री पूजा सावंत असल्याचं त्यानं सांगितलं आहे. एका एंटरटेन्मेंट युट्यूब चॅनेलशी बोलताना पूजा सावंतचे दोन किस्से सांगितले. तो म्हणाला, “माझा वाढदिवस होता. त्यादिवशी नम्रता ताई म्हणजे नम्रता संभेराव हिने माझ्याबरोबरचा फोटो स्टेटस आणि स्टोरीला ठेवून शुभेच्छा दिल्या होत्या. हा स्टेटस आणि स्टोरी पूजा सावंतने पाहिली आणि ती नम्रता ताईला म्हणाली, तुमच्या शो मधल्या निखिलचा वाढदिवस आहे का? कारण तिला मी बने म्हणून माहित होतो, निखिल म्हणून नाही. त्यामुळे तिने आधी नीट विचारलं. मग तिने सांगितलं, माझ्याकडून त्याला शुभेच्छा दे आणि त्याला सांग मला त्याचं काम खूप आवडतं. नम्रता ताई म्हणाली, हो मी त्याला सांगते. तो खूप खूश होईल. कारण ताईला माहित होतं की, मला पूजा सावंत खूप आवडते. तिने मग त्यांच्या चॅटचा स्क्रीनशॉर्ट मला पाठवला आणि मला असं झालं की, हे खरं आहे का? ताईने मग पटवून दिलं की, खरंच तिचं आहे. त्या दिवशी मला असं झालं होतं की, आता मला कोणी शुभेच्छा दिल्या नाहीतरी चालेलं.”

हेही वाचा – Video: काजोलचा व्हिडिओ काढताना पडला पापाराझी; अभिनेत्रीच्या कृतीने वेधलं लक्ष, पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Nikhil Bane (@banenikhil)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे दुसरा किस्सा सांगत निखिल बने म्हणाला, “एकदा पूजा सावंत आमच्या ‘महाराष्ट्र हास्यजत्रे’च्या सेटवर प्रमोशनसाठी आली होती. त्यावेळेला ती मला स्वतःहून भेटायला आली आणि म्हणाली, ‘मी तुझी खूप मोठी चाहती आहे. मला तुझं काम खूप आवडतं.’ यावर मी रिअ‍ॅक्ट होऊ हेच मला कळतं नव्हतं. मी तिच्याकडे फक्त बघत बसलो होतो. मग तिने माझ्याबरोबर फोटो काढला आणि ती मला म्हणाली की, ही माझ्यासाठी फॅन मुमेंट आहे.”