मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून प्राजक्ता गायकवाडला ओळखले जाते. तिने आतापर्यंत विविध मालिकांमध्ये काम केले आहे. ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. या मालिकेत प्राजक्ताने महाराणी येसूबाई ही भूमिका साकारली होती. सध्या ती ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्यामध्ये काम करत आहे. नुकतंच प्राजक्ताने चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे.

प्राजक्ताने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत प्राजक्ताने गळ्यात आयडी, ब्लेझर परिधान केला आहे. प्राजक्ताने नुकतंच अभियांत्रिकी पदवी संपादन केली आहे. याबद्दल तिने एक पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा : “तुम्ही ब्राह्मण असूनही मांसाहार करता?” चाहतीच्या कमेंटवर सुकन्या मोने म्हणाल्या, “ते चांगलं की वाईट…”

“कॉम्प्युटर इंजिनिअरींग शिक्षण (Computer Engineering) पूर्ण केले. डिस्टिंक्शनसह प्रथम श्रेणीमध्ये पदवी संपादन केली. ( CGPA : 8.77 ), इंजिनिअर अभिनेत्री”, असे तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

प्राजक्ताने पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठातून कॉम्प्युटर इंजिनिअरींगचे शिक्षण घेतले आहे. तिच्या या पोस्टनंतर अनेक चाहत्यांनी यावर कमेंट केल्या आहेत. अनेकांनी तिच्या पोस्टवर ‘ताई शुभेच्छा’ असे कमेंट करत म्हटले आहे.

आणखी वाचा : “तिची मतं, कृती मला पटत नाही, पण…”, देवेंद्र फडणवीसांनी अमृता फडणवीसांबद्दल मांडलं स्पष्ट मत, म्हणाले “महिलांनी इतकी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान प्राजक्ता ही अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्यामध्ये झळकताना दिसत आहे. लवकरच ती एका दाक्षिणात्य चित्रपटात झळकणार आहे. काही आठवड्यांपूर्वी ती हैदराबाद इथं शूटिंगला गेली होती. तिने या चित्रीकरणावेळी नारळ फोडतानाचा व्हिडीओ शेअर केला होता.