‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वामुळे घराघरात पोहोचलेली सई लोकूर गेल्या वर्षी आई झाली. १७ डिसेंबर २०२३ रोजी तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. अभिनेत्रीने मुलीचं नाव ताशी असं ठेवलं आहे. नुकतीच सई लेकीसह तिच्या खास मैत्रिणींना भेटली.

‘बिग बॉस मराठी’च्या घरात सईची मेघा धाडे व शर्मिष्ठा राऊत यांच्याशी घनिष्ठ मैत्री झाली होती; जी अजूनही टिकून आहे. दीड वर्षांनंतर काल, १७ फेब्रुवारीला सई पहिल्यांदा आपल्या लेकीसह मेघा व शर्मिष्ठाला भेटली. यासंदर्भात तिने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केल्या आहेत.

हेही वाचा – “…म्हणून त्याची पाठ थोपटावी वाटली”, किरण मानेंनी केलं भरत जाधवांचं कौतुक, कारण…

सई लोकूरने काल इन्स्टाग्रामवर ताशीबरोबर आम्ही पहिल्यांदाच रोड ट्रीप करत असल्याचं चाहत्यांबरोबर शेअर केलं. ती म्हणाली, “पहिल्यांदाच आम्ही रोड ट्रीप ताशीसह करत आहोत. मी कुठे चालली आहे? हे मी लवकरच सांगेन. ताशी आज दोन खूप महत्त्वाच्या लोकांना भेटणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं, तुम्ही ओळखा ते दोन लोकं कोण आहेत? मला कमेंटमध्ये सांगा. लवकरच मी खुलासा करेन.”

त्यानंतर सईने दुसरी स्टोरी शेअर करून त्या दोन लोकांचा खुलासा केला. अभिनेत्री म्हणाली, “हाय. मी आता माझ्या गंतव्यस्थानी पोहोचली आहे. मी खूप आनंदी आहे, कारण अनेक जणांनी बरोबर ओळखलं आहे. ताशी आज दोन खूप महत्त्वाच्या लोकांना भेटली. ते दोन महत्त्वाचे लोकं आहेत, मेघा धाडे व शर्मिष्ठा राऊत. आम्ही अखेर दीड वर्षांनी भेटलो आहोत. आमच्यात बराच बदल झाला आहे, याचा मला खूप आनंद आहे. एक मॅडम निर्मात्या झाल्यात, एका मॅडमनी राजकारणात प्रवेश केला आहे व नवीन व्यवसाय सुरू केला आहे, त्याच्याबद्दल मी सांगणार आहे आणि एक मॅडम आई झाली आहे. आम्ही खूप आनंदी आहोत. आम्ही एन्जॉय करतोय. एकमेकांना भेटलो याचा भरपूर आनंद झाला आहे. मी लवकरच पोस्ट करेन.”

हेही वाचा – Video: पूजा सावंतच्या साखरपुड्यात मित्र-मैत्रीणींची धमाल-मस्ती, प्रार्थना बेहेरेने शेअर केला व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सई लोकूरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, अभिनय क्षेत्रापासून दूर असली तरी ती नेहमी चर्चेत असते. सध्या ती मातृत्व एन्जॉय करत आहे. ‘सनम हॉटलाइन’ या वेब सीरिजमध्ये सई शेवटची पाहायला मिळाली होती.