मराठी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून सुप्रिया पाठारे यांना ओळखले जाते. सध्या त्या ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेत झळकताना दिसत आहे. सुप्रिया पाठारे यांनी आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपट, नाटक यात महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. मालिका विश्वात त्या अगदी मुरलेल्या आहेत. नुकतंच त्यांनी एक पोस्ट केली आहे. त्यामुळे त्या चर्चेत आल्या आहेत.

सुप्रिया पाठारेने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्या उमरखाडीचा राजाचे दर्शन घेताना दिसत आहे. याचे कॅप्शन सध्या व्हायरल होत आहे.
आणखी वाचा : “मला अजूनही हे घर…” सई ताम्हणकरचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत, म्हणाली “उद्या…”

“दरवर्षी उमरखाडीचा राजाच दर्शन होतच होत, पण ह्या वर्षी जरा कठीण वाटलं, पण वर्षा बंगल्यावरून दर्शन घेऊन निघालो आणि वेगळ्याच रस्त्याने आलो ते थेट jj हॉस्पिटलचा सिग्नल, मग काही राहवलं नाही आणि ह्या वर्षी दर्शन झालंच, बाप्पाचा हात पाठीशी असताना कसलीच चिंता नाही,गणपती बाप्पा मोरया”, अशी पोस्ट सुप्रिया पाठारे यांनी केली आहे.

त्यांच्या या पोस्टवर अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहेत. अनेकांनी यावर “गणपती बाप्पा मोरया” अशी कमेंट केली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या लेकाच्या हॉटेलमुळे चर्चेत आहेत.

आणखी वाचा : ‘असं’ आहे सुप्रिया पाठारे यांच्या लेकाने ठाण्यात सुरू केलेलं नवीन हॉटेल, पाहा खास झलक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुप्रिया पाठारे यांचा मुलगा मिहिर पाठारे हा प्रोफेशनल शेफ आहे. परदेशात प्रसिद्ध असणारी फूड ट्रकची संकल्पना त्याने ठाण्यात सुरू केली होती. तिथे यश मिळवल्यानंतर आता त्याने ठाण्यात स्वतःच नवीन हॉटेल सुरू केलं आहे.