‘फुबाईफू’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री विशाखा सुभेदार आज खलनायिकेच्या भूमिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘शुभविवाह’ मालिकेत विशाखाने खलनायिकेची (रागिणी) भूमिका साकारली असून तिला यंदा या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट खलनायिकेचा पुरस्कार देखील मिळाला. अशा लोकप्रिय अभिनेत्रीच्या भाचीने देखील तिच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे.

अभिनेत्री विशाखा सुभेदारची भाची ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत झळकली आहे. यासंदर्भात विशाखाने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट केली असून कलाकार मंडळींसह तिचे चाहते तिच्या भाचीचं कौतुक करत आहेत.

हेही वाचा – Video: “याला म्हणतात प्रोमो”, शिवानी सुर्वे-समीर परांजपेच्या मालिकेच्या नव्या प्रोमोचं नेटकऱ्यांकडून कौतुक, म्हणाले…

“राधा…आई कुठे काय करते…माझी भाची. आमची बाहुली”, असं कॅप्शन लिहित विशाखाने भाचीचा व्हिडीओ शेअर केला आहे. विशाखाची भाची ‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेत झळकली आहे. या व्हिडीओत, विशाखाची भाची अरुंधतीला तिच्या बाबांविषयी सांगताना दिसत आहे.

हेही वाचा – Video: ‘नवरी मिळे हिटलरला’मधील लीलाचं ‘हीरामंडी’तील ‘चौदहवी शब’ गाण्यावर सुंदर नृत्य अन् अदाकारी, नेटकरी म्हणाले, “लय भारी…”

हेही वाचा – Video: अनंत-राधिकाचं दुसरं प्री-वेडिंग होतंय ते आलिशान क्रूझ पाहिलंत का? प्रसिद्ध पंजाबी गायकाने व्हिडीओ केला शेअर, म्हणाला…

दरम्यान, विशाखाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने विनोदी कार्यक्रम आणि मालिकांव्यतिरिक्त बऱ्याच चित्रपट, नाटकात काम केलं आहे.  ‘फक्त लढ म्‍हणा’ (२०११), ‘४ इडियट्स’ (२०१२) आणि ‘अरे आवाज कोनाचा’ (२०१३), ‘ये रे ये रे पैसा’ (२०१८) आणि ‘६६ सदाशिव’ (२०१९) अशा काही चित्रपटांमध्ये ती झळकली आहे. अलीकडेच ती प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटात पाहायला मिळाली होती. या चित्रपटात तिने शार्पशूटर मग्रूची भूमिका साकारली होती.

हेही वाचा – Video: “सौ दर्द दिए उसने जो दर्द का मरहम था…”, अजय देवगण व तब्बूच्या नव्या चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसंच सध्या तिचं मालिकेसह रंगभूमीवर ‘कुर्रर्रर्रर्र’ हे नाटक जोरदार सुरू आहे. या नाटकात विशाखाबरोबर अभिनेता प्रियदर्शन जाधव, मयुरा रानडे, पंढरीनाथ कांबळे काम करत आहेत. महत्त्वाचं म्हणजे या नाटकात विशाखाने दोन भूमिका साकारल्या आहेत. अभिनयबरोबरच ती या नाटकाच्या निर्मिती धुरा देखील सांभाळत आहे. अभिनेता प्रसाद खांडेकरने ‘कुर्रर्रर्रर्र’ या नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे.