अभिनेत्री विशाखा सुभेदारने आजवर प्रेक्षकांना तिच्या विविध भूमिकांच्या माध्यमांतून खळखळून हसवलं. ‘फू बाई फू’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमांमधून तिने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. शिवाय मराठी मालिकांमध्येही तिने साकारलेल्या भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्या. विशाखा नाटकांमधूनही प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते. सध्या ती तिच्या नाटकासाठी परदेशात आहे. यादरम्यान तिने सोशल मीडियाद्वारे एक पोस्ट शेअर केली आहे.

विशाखा, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, पंढरीनाथ कांबळे आदी कलाकार ‘कुर्रर्रर्र’ नाटकासाठी परदेशात गेले आहेत. अमेरिकेमध्ये या नाटकाचे प्रयोग सुरू आहेत. दरम्यान नाटकासाठी काम करत असताना विशाखाने तिचा एक अनुभव शेअर केला. तसेच नाटकादरम्यानचे काही फोटोही शेअर केले आहेत.

आणखी वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून ब्रेक घेत प्रसाद खांडेकर अमेरिकेला रवाना, कारण…; पत्नी, मुलासह फोटो शेअर करत म्हणाला…

विशाखा सुभेदारची पोस्ट

विशाखाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती व नम्रता कपड्यांना इस्त्री करताना दिसत आहे. तर नाटकामधील इतर कलाकार नाटकाची तयारी करताना दिसत आहे. पण या कलाकारांना स्वतःची कामं स्वतःच करावी लागत आहे. विशाखानेच याबाबत पोस्ट शेअर करत सांगितलं. ती म्हणाली, “शोसाठी गेलो आहोत. अनेक कामं स्वतःच करावी लागतात. इस्त्री, सेट, लाइट्स, प्रॉपर्टी, म्युझिक या सगळ्या जबाबदाऱ्या आम्ही पेलवत आहोत”.

आणखी वाचा – “लोकांना असं वाटतं की, आमच्याकडे खूप पैसे आहेत पण…” वनिता खरातचा खुलासा, म्हणाली, “माझे आई-वडील अजूनही…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, पॅडी कांबळे, शशी केरकर, महेश सुभेदार संपूर्ण ‘कुर्रर्रर्रर्र’ टीमचे आभार. थोडं दमतोय, झोपेचं खोबरं होत आहे. पण परदेशात आपल्या माणसांची कौतुकाची थाप खूप समाधान मिळवून देते. आणि शेवटच्या शोमध्ये प्रत्येक शोला थकलेले आम्ही पुन्हा एकदा पुढच्या प्रवासासाठी सज्ज होतो”. विशाखाची ही पोस्ट पाहून चाहत्यांनी तिचं व कलाकार घेत असलेल्या मेहनतीचं कौतुक केलं आहे.