Marathi Singer Reaction on Reality Shows : रिअ‍ॅलिटी शोमध्ये रिअ‍ॅलिटी किती असते? हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. अनेकदा या रिअ‍ॅलिटी शोमधून स्पर्धकांची गरीबीच दिसते किंबहुना ती दाखवली जाते. त्यामुळे रिअ‍ॅलिटी शो स्क्रिप्टेड असण्यावर अनेकांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळतात.

कोणी याला थेट विरोध करतो, तर कोणी अप्रत्यक्षपणे रिअ‍ॅलिटी शो स्क्रिप्टेड असल्याचं सांगतात. याआधी लुईस टेरेन्स, गीता कपूर, गायक शान सारख्या अनेक कलाकारांनी रिअ‍ॅलिटी शो स्क्रिप्टेड असण्याबद्दल त्यांची मतं व्यक्त केली आहेत. अशातच आता मराठी संगीतकार आणि गायक अवधुत गुप्तेने याबद्दल त्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

अवधुतने मालिका, चित्रपटांसाठी गायन केलं आहे. तसंच तो परीक्षक म्हणूनही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याने नुकत्याच एका मुलाखतीत रिअ‍ॅलिटी शो स्क्रिप्टेड असतात की नाही? याबद्दल त्याचं मत व्यक्त केलं.

‘सर्व काही’ या पॉडकास्टमध्ये ‘रिअ‍ॅलिटी शो खरंच असतात का?’ असा प्रश्न अवधुतला विचारण्यात आला. याचं उत्तर देत अवधुत म्हणतो “या प्रश्नापेक्षा मला अनेक लोक विचारतात की, आम्ही ज्या कमेंट्स करत; त्या खऱ्या असतात का? कोण लिहून देतं का? यातलं काहीच स्क्रिप्टेड नसतं. त्यामुळेच त्याला नॉन-फिक्शन म्हणतात.”

यापुढे तो म्हणाला, “कोणत्याही चॅनेलमध्ये फिक्शन आणि नॉन-फिक्शन असे दोन भाग असतात. फिक्शनमध्ये सासू-सूनांच्या मालिका असतात आणि डान्स आणि गाण्यांचे शो नॉन-फिक्शनमध्ये येतात. रिअ‍ॅलिटी शोमधून तुम्ही रिअ‍ॅलिटी काढली; तर शो मरून जातील. आम्ही ती रिअ‍ॅलिटी कॅमेऱ्यावर चित्रीत करण्याचा प्रयत्न करतो.”

अवधुत गुप्ते इन्स्टाग्राम पोस्ट

यानंतर त्याने हिंदी रिअ‍ॅलिटी शोबद्दल म्हटलं, “हिंदीत हे सगळं घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो. स्पर्धकांच्या आई-वडिलांची स्टोरी, संघर्ष हे सगळं सांगण्याचा प्रयत्न केला जातो. मी निर्माता म्हणून जोपर्यंत रिअ‍ॅलिटी शो केले किंवा करतोय तोपर्यंत असं काही केलं नाही. आम्ही रिअ‍ॅलिटीच सांगण्याचा प्रयत्न केलाय. आम्ही स्पर्धकांच्या आई-वडिलांपर्यंत कॅमेरे पाठवून त्यांचे आनंद-दु:ख चित्रीत करण्याचा प्रयत्न करु.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापुढे अवधुत म्हणाला, “आम्ही हे घडवून आणत नाही. कारण ते चांगले अभिनेते नसतात. ती साधी माणसं आहेत. तुम्ही त्यांना अभिनय का करायला लावता? त्यामुळे बघणाऱ्या प्रेक्षकालाही कळतं की, ही आई खोटी रडत आहे किंवा वडील खोटे रडत आहेत. काही नैसर्गिक भावना वेचता आल्या तर वेचाव्यात.”