‘सारेगमप लिटिल चॅम्प’ या शोच्या माध्यमातून नावारुपाला आलेली गायिका म्हणजे कार्तिकी गायकवाड. ती तिच्या सुमधूर आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करते. आजवर तिने अनेक गाण्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. कार्तिकीच्या आजवरच्या यशात तिच्या आई वडिलांचा मोठा हात आहे. नुकतंच कार्तिकीने तिच्या चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे.

लोकप्रिय गायिका कार्तिकीने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत तिचे संपूर्ण कुटुंब पाहायला मिळत आहे. कार्तिकी गायकवाडने नुकतीच नवीन गाडी खरेदी केली आहे.
आणखी वाचा : “प्रसिद्धीसाठी वापर, पॉकेटमनी अन्…”, मानसी नाईकने सांगितली लग्न व घटस्फोटाची संपूर्ण कहाणी; म्हणाली “त्यांच्या घरी धुणी-भांडी”

कार्तिकीने शेअर केलेल्या या व्हिडीओत तिचा भाऊ, आई, वडील आणि संपूर्ण गायकवाड कुटुंब पाहायला मिळत आहे. या व्हिडीओत कार्तिकीचा भाऊ गाडीची पूजा करताना दिसत आहे. यानंतर ते घरी गाडी घेऊन येतात आणि गाडीची आरतीही करताना दिसत आहे.

आणखी वाचा : कार्तिकी गायकवाडच्या लहान भावाने वडिलांना भेट दिली मर्सिडीज गाडी, म्हणाली “अवघ्या २२ व्या वर्षी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कार्तिकीने फॉर्च्युनर ही गाडी खरेदी केली आहे. या गाडीची किंमत साधारण ३३ ते ५० लाखांच्या आसपास आहे. तिने या व्हिडीओला कॅप्शन देताना ‘घरातील नवीन सदस्य’ असे म्हटले आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेक कलाकारांनी कमेंट करत कार्तिकीला आणि कुटुंबाला शुभेच्छा दिल्या आहेत.