गेले काही महिने एमसी स्टॅन हा ‘बिग बॉस १६’मुळे चांगलाच चर्चेत आला आहे. ‘बिग बॉस १६’चा विजेतेपद जिंकल्यावर त्याच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्याचबरोबर यामुळे स्टॅनचा चाहतावर्गही प्रचंड वाढला आहे. तो ज्या परिस्थितीतून इतका वर आला आहे त्यामुळे त्याचं अधिक कौतुक होत आहे. पण आता एका मुलाखतीत त्याने याच सर्व परिस्थितीचे वर्णन करत त्याला मारून टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता असं धक्कादायक विधान केलं आहे.

एमसी स्टॅनने नुकतीच ‘द रणवीर शो’ या यूट्यूब चॅनलला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने ‘बिग बॉस’बरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला. लहानपणापासून त्याची झालेली जडण घडण, त्या परिस्थितीत जगताना त्याला मिळालेली शिकवण, आसपास घडणारी हिंसा, गुन्हेगारी विश्व याबद्दल स्टॅनने या मुलाखतीमध्ये मानमोकळेपणाने भाष्य केलं आहे. हे सगळं सांगत असताना काही लोकांनी त्याला देखील जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता असंही तो म्हणाला.

आणखी वाचा : एमसी स्टॅन ठरला किंग! ‘बिग बॉस १६’ विजेत्याने ‘या’ बाबतीत विराट कोहलीलाही टाकलं मागे

स्टॅन म्हणाला, “आमच्या मित्राचा वाढदिवस होता. आम्ही त्याचा केक कापला आणि इतक्यात काही लोकांनी त्याला मारण्यास सुरुवात केली. मानेवर तलवारीने वार केला तर दुसऱ्याने डोक्यात वार केला. हे सगळं आमच्या समोर सुरू होतं. माझ्या बाबतीतही दोन-तीन वेळा असं घडलं आहे. पी-टाऊनमधील काही लोकांची मला जीवे मारण्याची इच्छा होती. त्यांनी तसा प्रयत्न केला होता. तीन-चार वेळा ते मला मारण्यासाठी धावले होते. पण देवाच्या कृपेने मी दरवेळी वाचलो.”

हेही वाचा : लिंक्डइनने ब्लॉक केलं सनी लिओनीचं अकाउंट, कारण ऐकून नेटकरी हैराण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता त्याची ही मुलाखत खूपच चर्चेत आली आहे. त्याच्या या बोलण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. आता या वायरल व्हिडीओवर कमेंट करत नाहीत तरी विविध प्रतिक्रिया देत आहेत.