‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’मधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेले प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी काही दिवसांपूर्वी प्रेमाची कबुली दिली. नुकतंच प्रथमेश लघाटेचे पहिलं केळवण पार पडलं. त्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. आता प्रथमेशच्या या व्हिडीओवर मुग्धाने कमेंट केली आहे.
प्रथमेश लघाटेने इन्स्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत चतुरंग प्रतिष्ठानतर्फे त्याचे केळवण आयोजित केल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओत त्याने जेवणाच्या ताटाचा फोटो पोस्ट केला आहे. प्रथमेशला चांदीच्या ताटात वरण, भात, पूरणपोळी असे त्याच्या आवडीचे पदार्थ केळवणासाठी वाढण्यात आले होते.
आणखी वाचा : Video : चांदीच्या ताटातील पक्वान्न, सुंदर उखाणा अन्… प्रथमेश लघाटेच्या पहिल्या केळवणाचा थाट पाहिलात का?
यावेळी प्रथमेशने उखाणाही घेतला. “वाढलेलं पान रिकामी केलं एक एक घास घेत घेत, चतुरंगच्या कार्यालयामध्ये माझ्या जेवणाचा फक्कड जमला बेत”, असा हटके उखाणा घेत त्याने सर्वांचे आभार मानले आहेत.
“आमचं ठरलंय” च्या घोषणेनंतर आता हळूहळू केळवाणांना सुरुवात होतीय! हे फीलिंग खूप भारी आहे! अतिशय पारंपरिक पद्धतीने, प्रचंड आपुलकीने, पंच पक्वांनाच्या जेवणाने, अतिशय आग्रहाने खाऊ घालून माझ्या केळवणांचा शुभारंभ “चतुरंग” ने केला त्याबद्दल चतुरंग च्या पूर्ण टीम ला खूप खूप धन्यवाद!, असे कॅप्शन प्रथमेश लघाटेने या व्हिडीओला दिले आहे.

दरम्यान प्रथमेश लघाटेच्या केळवणाच्या व्हिडीओवर मुग्धाने कमेंट केली आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मुग्धाने “किती छान” असे म्हटले आहे. त्याबरोबर तिने हार्ट इमोजीही पोस्ट केले आहेत. त्यावर प्रथमेशनेही हार्ट इमोजी पोस्ट करत तिच्या कमेंटला उत्तर दिलं आहे.
