सब टिव्हीवरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. ही मालिका सुप्रसिद्ध लेखक तारक मेहता यांच्या ‘दुनिया ने ओढा चष्मा’ या लेखांवर आधारित आहे. या मालिकेने टीआरपीचे बरेचसे विक्रम मोडले. या मालिकेतील कलाकारांनाही प्रेक्षकांकडून प्रचंड चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो. यात काम करणाऱ्या सर्व कलाकारांचे फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे. आता यात सोनू भिडेची भूमिका करणारी निधी भानुशाली चर्चेत आली आहे.

आणखी वाचा : Video: सपना चौधरीची यंदाची दिवाळी भारतीय सैन्यातील जवानांबरोबर, सर्वत्र होतोय कौतुकाचा वर्षाव

काही दिवसांपूर्वी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेला तारक मेहताची भूमिका साकारणाऱ्या शैलेश लोढा यांनी अलविदा केल्यामुळे चर्चेत आला. या मालिकेत आत्माराम तुकाराम भिडे यांच्या मुलीची भूमिका साकारणारी सोनू भिडे सध्या चर्चेत आहे. सोनू भिडेची भूमिका साकारणाऱ्या निधी भानुशालीने तिचे दिवाळी साजरी करतानाचे फोटो पोस्ट केले आहेत.

या फोटोंमध्ये निधीसोबत तिचे संपूर्ण कुटुंब दिसत आहे. पण हे तिच्या दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो पाहून प्रत्येकालाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण या फोटोंमध्ये तिला ओळखणे कठीण झाले आहे. निधीने दिवाळीपूर्वी तिचा लूक बदलला असून आता तिने केस अगदी लहान केले आहेत. हे फोटो पोस्ट करताना तिने कॅप्शनमधून चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

हेही वाचा : Bigg boss 16: अब्दू रोजिकने चाहत्यांना दिल्या दिवाळीच्या खास शुभेच्छा; व्हिडीओ प्रचंड व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र तिच्या काही चाहत्यांना तिचा बदललेला लूक आवडला नाही. निधीच्या फोटों कमेंट करत एका नेटकऱ्याने लिहिले, “आधी किती गोंडस दिसायचीस, पण आता तू केस कापलेस.” तसेच अनेकांनी ही हेअरस्टाईल तिच्या चेहऱ्याला चांगली दिसत नसल्याचेही स्पष्ट शब्दात सांगितले आहे.