‘पारू'(Paaru) मालिकेत सतत नाट्यमय घडामोडी घडताना दिसतात. कधी पारू वडिलांच्या सांगण्यावरून गावी जायला निघते, तर कधी अहिल्यादेवीला पारूविषयी गैरसमज निर्माण होतात, अनुष्काच्या कट-कारस्थानामुळे अहिल्यादेवी व आदित्य यांच्यामध्ये दुरावा येतो, आदित्य व प्रीतम यांच्यामध्ये भांडण होतात, तर कधी आईसाठी आदित्य अचानक अनुष्काबरोबर साखरपुडा करण्याचा निर्णय घेतो. आता मात्र, अनुष्काचे सत्य सर्वांसमोर येणार का, असा प्रश्न समोर आलेला प्रोमो पाहिल्यानंतर निर्माण होत आहे.

मी त्या दिवशी…

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर पारू मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोच्या सुरूवातीला पाहायला मिळते की, प्रितम, प्रिया, पारू व आदित्य एकत्र आहेत. प्रितम प्रियाच्या डोक्यावर हात ठेवतो व म्हणतो, “मी त्या दिवशी दारू प्यायलो नव्हतो. त्यानंतर आदित्य प्रितमकडे वळतो व म्हणतो की प्रितम त्या दिवशी नेमकं काय- काय झालं हे नीट आठवून सांग. प्रितम म्हणतो, “एक मिनिट दादा, माझ्या रूममध्ये त्या दिवशी अनुष्का आली होती. तिने मला एक पेढा दिला आणि तो खाल्ल्यानंतर माझी कंडिशन खराब झाली.” प्रितमचे हे बोलणे ऐकल्यानंतर प्रिया काय असे म्हणते. त्यानंतर प्रितम, आदित्य, पारू व प्रिया सगळे जिथे अनुष्का बसली आहे, तिथे जातात. आदित्य अनुष्काला म्हणतो, आता मी जे विचारतोय, त्याचं मला सरळ सरळ उत्तर हवंय. आदित्याच्या या बोलण्यानंतर अनुष्काच्या चेहऱ्यावर भीती दिसत आहे.

हा प्रोमो शेअर करताना, “प्रितमच्या बोलण्यातून अनुष्काच्या वागण्यामागचं सत्य समोर येईल का..?” अशी कॅप्शन दिली आहे.

पारू मालिकेत दाखविल्याप्रमाणे, काही दिवसांपूर्वी अहिल्यादेवीने आदित्य व अनुष्काचे लग्न ठरवले आहे. पारूचे आदित्यच्या आयुष्यात असलेले इतके महत्व अनुष्काला आवडत नाही. त्यामुळे ती सतत पारू व आदित्य एकमेकांपासून कसे दूर राहतील, याचा विचार करते. या सगळ्यात तिने आदित्यच्या अनुपस्थितीत पारूचे ब्रँड अॅम्बेसेडर पद काढून घेतले. या सगळ्याचा आदित्य व प्रितमला त्रास झाला. आता आदित्यने अनुष्काबरोबरच्या साखरपुड्याला सहमती दिली आहे. त्यानंतर प्रितम आदित्यने हा निर्णय इतक्या घाईत का घेतला, हे विचारण्यासाठी जात होता. मात्र, तितक्यात अनुष्काने त्याला अडवत एक पेढा खाण्यासाठी दिला. यामध्ये तिने काहीतरी मिसळल्याचे मालिकेत पाहायला मिळाले. त्यानंतर प्रितम नशेत होता. त्याच अवस्थेत तो आदित्यबरोबर बोलण्यासाठी गेला. तिथे त्यांच्यात वाद झाला. आदित्यने प्रितमच्या कानाखाली दिली. या सगळ्यामुळे प्रितम दुखावल्या गेल्याचे पाहायला मिळाले. आता अनुष्काचे सत्य समोर येणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.