२०२० साली प्रेक्षकांच्या भेटीस आलेली ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. या मालिकेतील प्रत्येक पात्र घराघरात पोहोचलं होतं. मालिकेतील कलाकारांना त्या पात्रांद्वारेच ओळखलं जाऊ लागलं होतं. कीर्ती-शुभमची जोडी चांगलीच हीट झाली होती. आता हिच जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

‘फुलाला सुगंध मातीचा’ या लोकप्रिय मालिकेत अभिनेत्री समृद्धी केळकर हिने कीर्ती ही भूमिका साकारली होती. तर अभिनेता हर्षद अतकरीने शुभम साकारला होता. समृद्धी व हर्षदने साकारलेल्या पात्रांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. त्यामुळे आजही प्रेक्षक दोघांना पुन्हा एकदा पाहू इच्छितात. आता प्रेक्षकांची हीच इच्छा पूर्ण होणार आहे.

हेही वाचा – Video: एसएस राजामौली यांचा पत्नीसह एआर रेहमान यांच्या ‘या’ गाण्यावर जबरदस्त डान्स, व्हिडीओ व्हायरल

‘मी होणार सुपरस्टार-जोडी नंबर 1’ या ‘स्टार प्रवाह’च्या कार्यक्रमात कीर्ती-शुभम म्हणजे समृद्धी व हर्षद पाहायला मिळणार आहेत. गुढीपाडवा विशेष भागात समृद्धी व हर्षद यांचा एकत्र परफॉर्मन्स होणार आहे. याचा व्हिडीओ ‘स्टार प्रवाह’च्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा – लवकरच आई होणाऱ्या कार्तिकी गायकवाडचं घर आहे खूपच सुंदर, पाहा फोटो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘मी होणार सुपरस्टार-जोडी नंबर 1’ हा ‘स्टार प्रवाह’चा लोकप्रिय डान्स रिअ‍ॅलिटी शो आहे. अंकुश चौधरी, फुलवा खामकर व वैभव घुगे हे या शोचे परीक्षक आहेत. तर समृद्धी केळकर हिच्यावर सूत्रसंचालनाची जबाबदारी आहे.