अभिनेत्री प्राजक्ता माळी कामामधून वेळ काढत आपल्या कुटुंबाला वेळ देताना दिसते. कुटुंबाबरोबर मनसोक्त फिरणं असो वा एखादा घरगुती कार्यक्रम ती आवर्जुन हजेरी लावते. यादरम्यानचे बरेच फोटो व व्हिडीओही ती तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर करताना दिसते. आताही प्राजक्ता तिच्या भावाच्या लग्नाला पोहोचली आहे. या लग्नासोहळ्याचे बरेच फोटो व व्हिडीओही प्राजक्ताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.

आणखी वाचा – Video : किरण माने घरातून बाहेर पडताच विकास सावंत बदलला? अपूर्वा नेमळेकरशी मैत्री अन्…; प्रेक्षकही संतापले

भावाच्या लग्नासाठी प्राजक्ताने खास नऊवारी साडी परिधान केली. इतकंच काय तर या साडीवर तिने परिधान केलेले दागिने कोल्हापूरहून खरेदी केली. प्राजक्ताने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे खास फोटो शेअर करत घरातील नव्या सदस्याचं स्वागत केलं आहे.

तिने कुटुंबासह फोटो शेअर करत म्हटलं की, “घरचं लग्न. गोतवळा जमल्यावर बरं वाटतं. नव्या पाहुणीचं कुटुंबात स्वागत आहे.” तसेच तिने ही पोस्ट शेअर करत तुम्ही लग्न कधी करताय? हे विचारू नका अशी गोड विनंती केली आहे.

आणखी वाचा – Video : “टिकली लावायची की नाही हे बाईला ठरवू द्या” झी मराठी वाहिनीने ‘तो’ व्हिडीओ शेअर करताच प्रेक्षक भडकले, म्हणाले, “हिंदू धर्म…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्राजक्ताच्या भावाचं नाव अभिषेक तर वहिनीचं नाव सायली आहे. सध्या ती कुटुंबाबरोबर घरातलं लग्न एण्जॉय करताना दिसत आहे. भावाच्या लग्नात प्राजक्ताच अगदी उठून दिसत होती हे फोटो व व्हिडीओमधून स्पष्ट होत आहे. प्राजक्ताने शेअर केलेल्या फोटोंवर अनेकांनी कमेंट करत तिच्या लूकचं कौतुक केलं आहे.