प्रार्थना बेहरे ही मराठी विश्वातील सुंदर, गोड आणि सोज्वळ अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मराठी चित्रपट आणि मालिकांमुळे प्रार्थना बेहरे ही नावारुपाला आली. सध्या ती माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत प्रमुख साकारताना दिसत आहे. आपल्या कामामधून वेळ काढत सोशल मीडियावरही ती सक्रिय असते. इतकंच नव्हे तर पती अभिषेक जावकरबरोबर ती अनेक व्हिडीओ शेअर करताना दिसते. आज तिने सोशल मीडियावर पुन्हा एकदा तिच्या नवऱ्याबरोबरचा एक रोमँटिक व्हिडीओ पोस्ट केला आहे. याचं खास कारण म्हणजे आज प्रार्थना-अभिषेकच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झाली आहेत.

प्रार्थनाने १४ नोव्हेंबर २०१७ मध्ये अभिषेक जावकरबरोबर लग्नगाठ बांधली. आज त्यांच्या लग्नाला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने तिने तिचे आणि अभिषेकचे काही रोमँटिक आणि गमतीदार क्षण चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. या व्हिडीओतून त्यांच्यातलं बॉण्डिंग पुन्हा एकदा समोर आलं आहे. या व्हिडीओत प्रार्थना आणि अभिषेक एकमेकांबरोबर छान वेळ घालवताना दिसत आहेत. एकमेकांबरोबर मजा मस्ती करत ते एकमेकांची काळजीही घेताना दिसत आहेत.

आणखी वाचा : “१०६ वर्षांची पेशवाई फक्त…”; शरद पोंक्षेंचं बाजीराव पेशवेंबद्दलचं वक्तव्य चर्चेत

या व्हिडीओत प्रार्थना अभिषेकसमोर नाचताना दिसत आहे, त्याचे खांदे चेपताना दिसत आहे, त्याची चेष्टा करताना दिसत आहे. तर दुसरीकडे अभिषेकही प्रार्थनाची मस्करी करताना दिसत आहे, तिला चिडवताना दिसत आहे, ती दोघं एकत्र गाताना दिसत आहेत, तर एका क्लिपमध्ये मजा मस्करीत त्यांनी एकमेकांचा गळाही धरला आणि मग नंतर मिठी मारली. हा व्हिडीओ पोस्ट करत प्रार्थनाने कॅप्शनमध्ये लिहिले, “हॅप्पी ५.”

तिच्या या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव करत त्यांचे मित्र मंडळी, प्रार्थनाचे चाहते त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. तसेच अनेकांनी त्यांच्यातल्या या बॉण्डिंगचं कौतुकही केलं आहे.

हेही वाचा : प्रार्थना बेहरेने अमिताभ बच्चन यांना विचारला होता चुकीचा प्रश्न; म्हणाली, “१६ वर्षीय मुलीवर प्रेम…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिषेक जावकर हा लेखक, दिग्दर्शक, निर्माता आहे. दक्षिणात्य चित्रपटसृष्टीत त्याने बरंच काम केलं आहे. तसंच त्याचे काही मराठी चित्रपटही प्रदर्शित झाले आहेत.