तेजश्री प्रधानला छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं. सध्या स्टार प्रवाहवर सुरू असलेल्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत ती प्रमुख भूमिका साकारत आहे. १६ नोव्हेंबरला अभिनेत्रीच्या आयुष्यात दु:खद घटना घडली. तेजश्रीच्या आई सीमा प्रधान यांनी मुंबईतील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. सरत्या वर्षाला निरोप देताना अभिनेत्रीने आईच्या आठवणीत इन्स्टाग्रामवर भावुक पोस्ट शेअर केली आहे.

तेजश्रीची आई लाडक्या लेकीच्या प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित असायची. दोघींमध्ये फारच सुंदर नातं होतं. त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये तेजश्रीच्या कामाचं कौतुक केलं होतं. ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेच्या स्पेशल स्कीनिंग देखील तेजश्रीचे आई-बाबा आले होते.

हेही वाचा : जोतिबाच्या नावानं चांगभलं! ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने जोडीदारासह घेतलं देवदर्शन, दोघांचा नववर्षाचा संकल्प वाचून कराल कौतुक

तेजश्रीने आईच्या आठवणीत इन्स्टाग्रामवर स्वत:चा ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर करत त्याला भावनिक कॅप्शन दिलं आहे. अभिनेत्री लिहिते, “मला माहित आहे की, तू तिथून मला पाहत आहेस. तू कायम माझ्याबरोबर आहेस हे मला ठाऊक आहे आणि याच विश्वासाने मी माझं यापुढचं संपूर्ण आयुष्य जगत राहणार आहे.”

हेही वाचा : Video: जान्हवी कपूरने दिली प्रेमाची कबुली? बॉयफ्रेंडबद्दल केलेलं विधान चर्चेत; महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातू आहे शिखर

दरम्यान, तेजश्रीच्या भावुक पोस्टवर सध्या नेटकऱ्यांच्या सांत्वनपर कमेंट्स येत आहेत. “तुझ्या आईचे आशीर्वाद कायम तुझ्याबरोबर आहेत.”, “आमची स्ट्राँग गर्ल”, “दगडापासून आपली मूर्ती घडवत असते, ती फक्त आणि फक्त आईच असते.” अशा कमेंट्स करत अभिनेत्रीच्या चाहत्यांनी तिला धीर दिला आहे.