Raha Kapoor : आलिया भट्ट व रणबीर कपूर यांची लाडकी लेक राहा सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. अवघ्या दीड वर्षांची राहा सर्वांची फेव्हरेट झाली आहे. राहाचा गोड अंदाज, तिचे हावभाव सर्वांचं लक्ष वेधून घेतात. कधी राहा तिचे आई-बाबा आलिया भट्ट व रणबीर कपूर यांच्याबरोबर फिरत असते तर, कधी काका अयान मुखर्जी आणि आजी-आजोबांसह ही चिमुकली फेरफटका मारायला जाते. राहाचा एक नवीन व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
राहा कपूर ( Raha Kapoor ) नुकतीच तिची आजी सोनी राजदानबरोबर गाडीत बसून फिरायला निघाली होती. आजीच्या मांडीवर बसून राहा खिडकीच्या बाहेर डोकावत होती… याचदरम्यान पापाराझींनी तिचा गोड अंदाज पुन्हा एकदा कॅमेऱ्यात टिपला आहे. ‘विरल भय्यानी’ या पापाराझी इन्स्टाग्राम पेजवरून राहाचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
हेही वाचा : ‘8.8.8’ नागा चैतन्य अन् सोभिताने साखरपुड्यासाठी का निवडली ही तारीख? जाणून घ्या खास कनेक्शन
आजी सोनी राजदानच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष
सोनी राजदान यावेळी नातीची काळजी घेताना दिसल्या. पापाराझी गाडीच्या जवळ जाताच त्यांनी काचा लावून घेतल्याचं पाहायला मिळालं. सोनी राजदान यांच्या या कृतीवर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. अनेकांनी राहाची काळजी म्हणून, सोनी राजदान यांनी योग्य निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे. तर, काही नेटकऱ्यांनी राहाच्या आजीला गाडीच्या काचा बंद केल्यामुळे ट्रोल केलं आहे. याशिवाय काही युजर्सनी पुन्हा एकदा राहाच्या गोड अंदाजाचं कौतुक केलं आहे.
हेही वाचा : Video : “डोळ्यात पाणी आणलंत…”, ड्रामा ज्युनिअर्सने ‘धर्मवीर’ चित्रपटातील केलेला ‘तो’ सीन पाहून प्रवीण तरडेंची प्रतिक्रिया, पाहा व्हिडीओ
राहा काही दिवसांपूर्वीच बाबा रणबीरसह घराच्या परिसरात फेरफटका मारताना दिसली होती. यावेळी पापाराझींना लांबून पाहत ती खुदकन हसली होती. केवळ नेटकऱ्यांचीच नव्हे तर राहा बॉलीवूड सेलिब्रिंटीची सुद्धा खूप लाडकी आहे.

राहाबद्दल ( Raha Kapoor ) सांगायचं झालं, तर ६ नोव्हेंबर २०२२ मध्ये आलियाने तिच्या गोंडस लेकीला जन्म दिला. यानंतर वर्षभराने म्हणजे २०२३ मध्ये ख्रिसमच्या दिवशी रणबीर-आलियाने आपल्या लेकीचा चेहरा माध्यमांसमोर रिव्हिल केला होता. यानंतर इंटरनेटवर राहाचे फोटो प्रचंड व्हायरल झाले होते.