हिंदी मनोरंजनसृष्टीत ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत नेहमीच चर्चेत असते. रोजच ती काही ना कही नवीन अतरंगीपणा करत सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. आता तिने रस्त्यावरच माधुरी दीक्षितच्या ‘धक धक करने लगा’ गाण्यावर नाच केला आहे. पण त्यानंतर मुंबईत मांजरीच्या रूपात तिला मिया खलिफा दिसली. तिच्या या नव्या व्हायरल व्हिडीओमुळे आता ती ट्रोल होऊ लागली आहे.
राखी सावंत नेहमीच मुंबईच्या रस्त्यांवर मीडिया फोटोग्राफर्सशी दिलखुलासपणे संवाद साधताना दिसते. तर नुकतीच एके ठिकाणी ती मीडिया फोटोग्राफर्सना दिसली. त्यावेळी राखीने रस्त्यावरच माधुरी दीक्षितच्या सुपरहिट ‘धक धक करने लगा’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तिने त्या गाण्याची हूक स्टेप करत सर्वांचं लक्ष वेधलं.
या गाण्यावर नाच केल्यावर तिने तिच्या आयुष्याबद्दल सांगायला सुरुवात करत तिचा अतरंगीपणा करायला सुरुवात केली. आजचा दिवस तिचा खूप खराब असल्याचं तिने म्हटलं. यानंतर तिला तिथेच एक मांजर दिसली. त्या मांजरीला झाडाच्या फांदीने बोलवत तिने त्या मांजरीला मिया खलिफा अशी हाक मारली.
हेही वाचा : “सर्व धर्मांची थट्टा…”; राखी सावंतकडून मोडला गेला रोजा, कारण ऐकताच संतापले नेटकरी
या व्हिडीओतील राखीचा डान्स आणि तिने त्या मांजरीला मारलेली हाक यामुळे आता ती चांगलीच ट्रोल होत आहे. एकाने लिहिलं, त्या मिया खलिफाने (मांजरीने) पंजा मारला तर १० दिवस अंथरूणात खिळून राहशील.” तर दुसऱ्याने लिहिलं, “हॅलो. मेंटल हॉस्पिटल..” तर आणखी एकाने लिहिलं, “हिला पाहून देवही विचार करत असेल की काय व्यक्तीला बनवलंय मी!”