बिग बॉस मराठीचा चौथा सीझन सध्या चांगलाच गाजताना दिसतोय. शोमध्ये वाइल्ड कार्ड म्हणून राखी सावंतची एंट्री झाल्यापासून तर शोची सोशल मीडियावरही जोरदार चर्चा आहे. राखी रोज काही ना काही करताना आणि घरातील सदस्यांना चिडवताना दिसते. काही दिवसांपूर्वीच घरातील सदस्यांनी तिच्यावर अक्षय केळकरच्या बेडवर अंडी फोडल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता राखीने पुन्हा बिग बॉसच्या घरात राडा घातला आहे.

बिग बॉस मराठी ४ चा नवा प्रोमो कलर्स मराठीने अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. कारण या व्हिडीओवरमध्ये राखी सावंत विचित्र मेकअप करून संपूर्ण घरात गोंधळ घालताना दिसत आहे. या गोंधळामुळेच घरातील सर्वांशी तिचं जोरदार भांडण झाल्याचंही पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा- “महेश मांजरेकरांनी माझं नाव बदललं”, राखी सावंतचा खुलासा; जाणून घ्या तिचं खरं नाव

व्हिडीओमध्ये राखी सावंतला सुरुवातील अमृता धोंगडे बाथरुममध्ये लॉक करून ठेवताना दिसत आहे. त्यानंतर राखी बाथरुममधून बाहेर पडल्यावर सर्वांना विचारते की, ‘तिला बाथरुममध्ये कोणी लॉक केलं होतं?’ पण त्यावर सर्वजण तिला नकारार्थी उत्तर देतात. त्यावर राखी म्हणते की, “तुम्ही कोणीच नाही म्हणजे मग मला तिनेच लॉक केलं होतं.”

आणखी वाचा- अरेरावीची भाषा, कडाक्याचं भांडण अन्… अपूर्वा-आरोहच्या वादात राखी सावंतने केलं असं काही की पाहतच राहिले सगळे!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याच व्हिडीओमध्ये राखी सावंत विचित्र मेकअप करताना दिसत आहे. त्यानंतर, “आता याचे परिणाम खूपच वाईट होणार बिग बॉस.” असं म्हणत राखी बाथरुममध्ये जाऊन बादलीतून पाणी आणते आणि बेडवर बसलेल्या अमृताच्या अंगावर फेकते. त्यामुळे अमृता चिडते आणि राखीबरोबर भांडते. त्यानंतर घरातील सदस्य मध्यस्थी करत या दोघांचं भांडण सोडवतात.