अभिनेत्री राखी सावंतने गेल्या वर्षी धर्मांतर करून आदिल खान दुर्रानीशी लग्न केलं होतं. काही महिने लग्नाची बातमी त्यांनी लपवून ठेवली होती. पण राखीला पतीच्या अफेअरबद्दल कळताच तिने लग्न झाल्याचं जाहीर केलं. त्यानंतर तिचं पतीशी बिनसलं, त्याने मारहाण केल्याचे आरोप राखीने केले आणि आदिल खान कोठडीत पोहोचला.
आदिल खान सध्या कोठडीत आहे. पण, राखीने त्याच्याशी धर्म बदलून लग्न केलं होतं, तिने तिचं नावही फातिमा ठेवलं होतं. आता रमजानचा पवित्र महिना सुरू झाला आहे. अशातच पती तुरुंगात असतानाही राखीने रमजानचे रोजे ठेवले आहेत. तिने आज पहिला रोजा ठेवल्यानंतर एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. या व्हिडीओत तिने तिचा अनुभव सांगितला.
परिणीती चोप्राशी अफेअरच्या चर्चांवर खासदार राघव चड्ढा यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
व्हिडीओमध्ये तिने गुलाबी रंगाचा हिजाब परिधान केलेला दिसत आहे. ती म्हणते, “हा माझा पहिला रोजा आहे. मी पहाटे ४ वाजता उठल्यावर सेहरी केली होती, पण मला अजिबात भूक लागलेली नाही आणि मी नमाज पठण केले. मी आता बऱ्याच गोष्टी शिकत आहे.”
दरम्यान, राखीच्या या व्हिडीओवर काही जणांनी तिला ट्रोल केलंय. “आता नवरात्रीही सुरू आहे, त्यामुळे थोडं लक्ष तिकडेही दे” असं तिला युजरने म्हटलं आहे.

काहींनी तिला रमजानच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर काहींनी तिच्या ओव्हर अॅक्टिंगचे पैसे कापा, असंही म्हटलं आहे.