Ram Kapoor Recalls Living Off Wife Gautamis Income For A Year During Initial Days In Industry : अभिनेता राम कपूर ‘बडे अच्छे लगते है’ या मालिकेतून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला. अभिनेत्याने चित्रपटांतदेखील काम केले. अनेकदा अभिनेता त्याच्या वक्तव्यांमुळेदेखील चर्चेत असतो.

राम कपूर हा टेलिव्हिजन आणि चित्रपटांमधील त्याच्या दमदार भूमिकांसाठी ओळखला जातो. अलीकडेच त्याच्या कार कलेक्शनमध्ये एक आलिशान कार खरेदी केल्यामुळे तो चर्चेत होता.

रामने त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित एक किस्सा सांगितला. तो म्हणाला की, तो एक वर्ष त्याच्या पत्नी गौतमीच्या पैशावर जगला. मनीकंट्रोलशी झालेल्या संभाषणात रामने कबूल केले, “जेव्हा मी गौतमीशी लग्न केले तेव्हा मी पहिले वर्ष तिच्या कमाईवर जगत होतो. ती लिपस्टिक नावाच्या शोसाठी चित्रीकरण करीत असे आणि माझ्याकडे कोणताही रोजगार नव्हता. मी उठायचो, तिला कॉफी बनवायचो आणि ती कामावर निघून जायची. मी वर्षभर घरीच राहिलो.”

रामने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात दूरदर्शनवरून केली, जिथे तो फक्त १००० रुपये प्रतिदिन कमवायचा. ‘घर एक मंदिर या दूरदर्शन शोने त्याला यश मिळवून दिले, जिथे तो गौतमीला भेटला. या शोने त्याला केवळ ओळखच दिली नाही, तर खऱ्या आयुष्यातील प्रेमकथेलाही चालना दिली.

“अशी चांगली वर्षे होती जेव्हा मी चांगली कमाई करत होतो आणि नंतर अशी वर्षे होती जेव्हा काहीच काम नव्हते,” असे राम म्हणाला. मुलाखतीदरम्यान, त्याने असेही म्हटले की उत्पन्नाबाबत अनिश्चितता असतानाही तो त्याच्या कलेशी वचनबद्ध राहिला.

१५०० रुपयांपासून केली सुरुवात : राम कपूर

एकता कपूरच्या ‘कसम से’ या मालिकेने त्याच्या कारकिर्दीला एक महत्त्वाचे वळण मिळाले, ज्यामुळे तो घराघरात लोकप्रिय झाला. “मी दररोज १५०० रुपयांपासून सुरुवात केली. ते आव्हानात्मक होते. पण, गौतमी माझ्या पाठीशी उभी राहिली आणि आता आम्ही कुठे आहोत ते पाहा,” असे राम म्हणाला. “ज्या क्षणी हा शो सुरू झाला, त्याच क्षणी माझ्या मुलीचा जन्म झाला आणि मी मागे वळून पाहिले नाही. ती आली तेव्हा सर्व काही बदलले,” असे तो पुढे म्हणाला.

गौतमी कपूर आणि राम कपूर यांची भेट ‘घर एक मंदिर’ या मालिकेच्या सेटवर झाली होती. या मालिकेपूर्वी अभिनेत्रीचे लग्न एका छायाचित्रकाराशी झाले होते; पण नंतर ते दोघे वेगळे झाले. गौतमीने एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘घर एक मंदिर’ या मालिकेत काम करत असताना तिचा घटस्फोट झाला. याच मालिकेत तिची तिच्या आयुष्यातील प्रेम आणि तिचा पती राम कपूरशी भेट झाली. लवकरच ते चांगले मित्र बनले आणि दोन वर्षांनी त्यांनी लग्न केले. तिची आई रामबरोबरच्या तिच्या लग्नाच्या विरोधात होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राम कपूरने ‘कसम से’, ‘बडे अच्छे लगते है’, ‘कहता है दिल’ अशा अनेक मालिकांमधून स्वत:ची ओळख निर्माण केली. त्याबरोबरच त्याने ‘एजंट विनोद’, ‘स्टुडंट ऑफ द इअर’, ‘उडान’ अशा काही चित्रपटांमध्येही काम केले आहे.