अभिनेत्री ऐश्वर्या नारकर गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतायत. चित्रपट, मालिका, नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. आजवर त्यांनी अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत त्या विरोचक या खलनायिकेची भूमिका साकारत आहेत.

ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. अनेकदा सेटवरची धम्माल-मस्ती, सहकलाकारांबरोबरचे डान्स व्हिडीओ त्या सोशल मीडियावर शेअर करत असतात. अशातच आता ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतील अभिनेत्री एका व्हायरल गाण्यावर थिरकल्या आहेत.

हेही वाचा… “शाळेतल्या एका मुलीसाठी…”, वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी ‘या’ प्रसिद्ध गायकाने सोडलं होतं घर, म्हणाला, “मी तिच्याकडे गेलो…”

ऐश्वर्या नारकर, तितीक्षा तावडे, एकता, अमृता सकपाळ अनेकदा ट्रेडिंग गाण्यावर रील्स करताना दिसतात. आता या चौघी “ए राजाजी…” या गाण्यावर थिरकल्या आहेत. “POV- लोक या काळजीत आहेत की विरोचकाचा मृत्यू कसा होईल? यादरम्यान विरोचक आणि कुटुंब” असं कॅप्शन ऐश्वर्या नारकरांनी या व्हिडीओला दिलं आहे.

ऐश्वर्या यांचा सहकलाकारांबरोबरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. मालिकेच्या चाहत्यांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं, “त्रिनैनेच्या मुली आणि विरोचक डान्सच्या मूडमध्ये आहेत.” तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “राजाध्यक्ष कुटुंब असा धोका देईल असं वाटलं नव्हतं.”

हेही वाचा… ‘सैराट’ फेम रिंकू राजगुरूच्या वडिलांना हवा आहे ‘असा’ जावई; अभिनेत्री म्हणाली, “हा मुलगा तर…”

सध्या मालिकेत काय घडतंय

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका आता रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. त्रिनैनेच्या मुली नेत्रा आणि इंद्राणी यांच्यावर अजूनही विरोचकाच्या मृत्यूची जबाबदारी आहे. पंचपेटीकीतली पाचवी पेटी सापडल्यानंतर विरोचकाचा मृत्यू होणार असं वाटत असतानाच विरोचक नव्या रुपात राजाध्यक्ष कुटुंबात येतो. आता पुढे काय घडेल याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात आहेत.

हेही वाचा… ‘ठरलं तर मग’ या मालिकेतील सायलीच्या भूमिकेसाठी जुई गडकरीला ‘असा’ करावा लागतो नट्टापट्टा, अभिनेत्रीने केला व्हिडीओ शेअर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या मालिकेत तितीक्षा तावडे नेत्रा नावाची प्रमुख भूमिका साकारत आहे. तर ऐश्वर्या नारकर विरोचकाची भूमिका साकारत आहेत. तर अजिंक्य ननावरे, एकता, अमृता सकपाळ , श्वेता मेहेंदळे, राहुल मेहेंदळे, जयंत घाटे यांच्याही निर्णायक भूमिका आहेत.