‘बिग बॉस’ हिंदीचा हा सोळावा सीझन सुरू आहे. पहिल्या दिवसापासूनच या कार्यक्रमात स्पर्धकांमध्ये घरात टिकून राहण्यासाठी चढाओढ पाहायला मिळतेय. हा सीझन प्रेक्षकांमध्ये चांगलाच लोकप्रिय झाला आहे. स्पर्धकांनी या घरामध्ये केलेले वाद-विवाद, त्यांची वक्तव्य याबरोबरच सलमान खानच्या सूत्रसंचालनाने या कार्यक्रमाची रंगत वाढवली. पण ‘बिग बॉस १६’च्या ग्रँड फिनालेचं सूत्रसंचालन करण्यातून सलमान खान एग्झिट घेणार असल्याचं बोललं जात आहे.

‘बिग बॉस’ या कार्यक्रमाचे नाव घेतलं की सलमान खानचा चेहरा आपोआप डोळ्यासमोर येतो. या शोच्या पहिल्या सीझनपासून तो या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आला आहे. या कार्यक्रमातील त्याच्या सूत्रसंचालनाचे करोडो चाहते आहेत. पण आता या सीजनच सूत्रसंचालन तो मध्यावरच सोडणार अशा चर्चा रंगल्या आहेत.

आणखी वाचा : वादाच्या भोवऱ्यात अडकूनही ‘पठाण’चे पहिल्या दिवशीचे शो परदेशात हाऊसफुल, ‘या’ तारखेपासून भारतात सुरु होईल ॲडव्हान्स बुकिंग

एकीकडे ‘बिग बॉस १६’चे आता शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत. पण दुसरीकडे सलमान खान बिग बॉसच्या फिनालेच सूत्रसंचालन करणार नाही असं बोललं जात आहे. याचं कारण म्हणजे ‘बिग बॉस १६’च्या फिनालेच्या तारखेआधीच सलमान खानचा या शोशी असलेला करार संपत आहे.

हेही वाचा : Video: “मी त्याला शुभेच्छा का देऊ…?” सलमान खानच्या वाढदिवशी ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला संताप अनावर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१२ जानेवारी २०२३ रोजी सलमान खानचा ‘बिग बॉस’शी असलेला करार संपत आहे. त्यामुळे हा करार पुन्हा नव्याने लवकरच केला नाही तर सलमान खानची जागा दुसरा कोणीतरी घेईल. मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खाननंतर हा शो करण जोहर होस्ट करू शकतो. या आधी करण जोहरने ‘बिग बॉस ओटीटी’चा सीझन होस्ट केला होता. त्याचबरोबर या सीझनदरम्यान सलमानला डेंग्यू झाला होता तेव्हाही करण जोहरने त्याची जागा घेतली. निर्माते करण जोहरशी चर्चा करत आहेत असंही समोर आलं आहे. परंतु आगामी काळात ‘बिग बॉस १६’चं सूत्रसंचालन सलमान करणार की त्याची जागा करण जोहर घेणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.