Kinshuk Vaidya Wedding: ‘शाका लाका बूम बूम’ मालिकेतून घराघरात पोहोचलेला संजू म्हणजे अभिनेता किंशुक वैद्य काही दिवसांपूर्वीच लग्नबंधनात अडकला. २२ नोव्हेंबरला किंशुकचा मराठी रितीरिवाजानुसार मोठ्या थाटामाटात लग्नसोहळा झाला. किंशुकने दिक्षा नागपाल हिच्याशी लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहेत.

नॅशनल चॅनलनंतर ‘स्टार प्लस’वर प्रसारित झालेली ‘शाका लाका बूम बूम’ मालिका ही लोकप्रिय मालिकांपैकी एक ठरली. लहान मुलांना या मालिकेचं अक्षरशः वेड लागलं होतं. या मालिकेतील संजू आणि त्याच्या जादूई पेन्सिलने लहान मुलांना अधिक आकर्षित केलं होतं. याच मालिकेतील संजू आता मोठा झाला आहे. ३३ वर्षांच्या संजूला पाहून तुम्ही ओळखू देखील शकणार नाही.

हेही वाचा – Bigg Boss 18: रजत दलाल आणि दिग्विजय सिंह राठी यांच्या मैत्रीत पडली फूट, पाहा नवा प्रोमो

ऑगस्ट महिन्यात संजू म्हणजे अभिनेता किंशुक वैद्यचा साखरपुडा झाला. त्यानंतर तीन महिन्यांनी किंशुक बोहल्यावर चढला. मराठी रितीरिवाजानुसार त्याचं लग्न झालं. या लग्नसोहळ्याला हिंदी मालिकाविश्वातील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. हळद, संगीत, सप्तपदी असं समारंभपूर्वक लग्न किंशुक आणि दिक्षाचं झालं. लग्नासाठी किंशुक आणि दिक्षाने खास मराठमोळा लूक केला होता. किंशुकच्या ( Kinshuk Vaidya ) बायकोने केशरी रंगाची नऊवारी नेसली होती. तर अभिनेत्याने ऑफ व्हाइट रंगाचा आउटफिट परिधान केला होता. ज्यावर त्याने लाल रंगाचा फेटा बांधला होता. दोघं खूप सुंदर दिसत होते. यावेळी किंशुकची बायको दिक्षाने मराठी उखाणा घेतला.

दिक्षा नागपालने मराठीत घेतलेल्या उखाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये दिक्षा मराठीत उखाणा घेत म्हणते, “गळ्यात मंगळसूत्र, ही सौभाग्याची खूण…किशूचं नाव घेते वैद्यांची सून.”

हेही वाचा – Video: आणखी एका नव्या मालिकेची घोषणा, दमदार प्रोमो होतोय व्हायरल; ‘ही’ अभिनेत्री झळकणार मुख्य भूमिकेत

हेही वाचा – ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेता आणि शिवानी सोनार लवकरच अडकणार लग्नबंधनात, बॅचलर पार्टीचे फोटो आले समोर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

किंशुक वैद्य ( Kinshuk Vaidya ) बायको कोण आहे?

किंशुकची ( Kinshuk Vaidya ) बायको दिक्षा नागपाल लोकप्रिय नृत्यदिग्दर्शिका आहे. ‘पंचायत २’ वेब सीरिजमधील एका आयटम साँगचं नृत्यदिग्दर्शन दिक्षाने केलं होतं. काही महिन्यांपूर्वी किंशुकचं ‘चन्ना वे’ नावाचं गाणं प्रदर्शित झालं होतं. या गाण्याचं दिग्दर्शन दिक्षाने केलं होतं. तसंच गाण्याची निर्मिती देखील तिच्याच कंपनीची होती. याशिवाय सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करणाऱ्या कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया ३’ चित्रपटात माधुरी दीक्षित आणि विद्या बालन यांना दिक्षाने कोरियोग्राफ केलं होतं.