‘होणार सून मी ह्या घरची’ ही मालिका छोट्या पडद्यावर प्रचंड लोकप्रिय ठरली. या मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. २०१३ ते २०१६ या कालावधीत झी मराठी वाहिनीवर ही मालिका प्रसारित केली जायची. तेजश्री आणि शशांकने साकारलेल्या श्री-जान्हवीच्या जोडीला अल्पावधीतच प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. या मालिकेला जुलैमध्ये १० वर्ष पूर्ण झाली. ‘द क्राफ्ट’ युट्यूब चॅनेलवर आयोजित दशकपूर्ती निमित्त गप्पांच्या कार्यक्रमात शशांकने हजेरी लावली होती. प्रसाद भारदे यांनी कलाकार, तंत्रज्ञांशी संवाद साधला. अमोघ पोंक्षे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम साकारला आहे. यावेळी अभिनेत्याने या मालिकेबद्दल अनेक खुलासे केले.

हेही वाचा : “VFX अतिशय टुकार, ड दर्जाचे…”, अक्षय कुमारच्या चित्रपटाबद्दल मराठी अभिनेत्याची पोस्ट, म्हणाले…

श्री-जान्हवीच्या जोडीशिवाय जान्हवीचं मंगळसूत्र, तिच्या सासवा, श्रीचे होणारे लाड या सगळ्या कथानकाशी प्रेक्षकवर्ग रिलेट करू लागला होता. म्हणून आजही या मालिकेच्या पात्रांची घरोघरी आठवण काढली जाते. मालिकेत श्रीच्या आजीच्या पात्र ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी साकारलं होतं. शशांकने पॉडकास्टमध्ये त्यांच्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या.

हेही वाचा : “माझ्या काळजाचा तुकडा”; सलमानने खानने दाखवला ‘त्या’ मिस्ट्री गर्लचा चेहरा, म्हणाला “प्रेम अन्…”

शशांक रोहिणी हट्टंगडी यांच्याविषयी सांगताना म्हणाला, “रोहिणी ताईंकडे सेटवर व्हॅनिटी व्हॅन होती, तरीही त्या सेटवर इतरांबरोबर बसायच्या. रोहिणी ताई आम्हाला कायम प्रेरणा देतात त्या आमच्यासाठी आदर्श आहेत. आमच्या सेटवर त्या सगळ्यात वरिष्ठ होत्या असं असतानाही त्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये कधीच एकट्या बसायच्या नाहीत. त्या आमच्या खोलीत येऊन आमच्याबरोबर गप्पा मारायच्या.”

हेही वाचा : Video: इस्रायल-पॅलेस्टाईनच्या युद्धावर राखी सावंतची प्रतिक्रिया; म्हणाली, “जोपर्यंत मोदी आहेत, तोपर्यंत…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“व्हॅनिटी व्हॅनमध्ये एकटं बसणं त्यांना आवडायचं नाही. त्या आजही प्रचंड मेहनती आहेत. सकाळी सेटवर वेळेत हजर राहून त्यांची शिफ्ट संपल्यावर त्या घरी जायच्या. सेटवर कधीच कोणतीही तक्रार नाही, चिडचिड नाही, काहीच नाही. आपण सर्व कलाकारांनी त्यांच्याकडून खूप काही शिकलं पाहिजे.” असं शशांकने सांगितलं. दरम्यान, ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेमुळे शशांक केतकर घरोघरी लोकप्रिय झाला. सध्या तो ‘मुरांबा’ या मालिकेद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.