Shashank Ketkar Reaction On Mumbai Traffic : ‘कालाय तस्मै नम:’, ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘हे मन बावरे’ या एकापेक्षा एक गाजलेल्या मालिकांमधून अभिनेता शशांक केतकर घराघरांत लोकप्रिय झाला. नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये त्याने काम केलेलं आहे. शशांकचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. उत्तम अभिनयाबरोबरच अनेकदा शशांक सोशल मीडियावर आपली स्पष्ट मतं मांडत असतो. यापूर्वी अभिनेत्याने रस्त्याच्या बाजूला झालेल्या कचरा प्रदूषणाबाबत पोस्ट शेअर केली होती. आता शशांक वाहतूक कोंडीमुळे संतापला आहे.

शशांक केतकरने सोशल मीडियावर शेअर केलेली एक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. शूटिंगला जाताना अभिनेता मुंबईतील ट्राफिकमध्ये अडकला आहे. तासभर एकाच ठिकाणी गाडी बंद करून उभा राहिल्याने शशांकने सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. व्हिडीओ शेअर करत अभिनेत्याने वाहतूक कोंडीची सद्य परिस्थिती सांगितली आहे.

हेही वाचा : मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाई का करत नाहीत?, घोडं कुठे अडतंय? महेश मांजरेकरांनी मांडलं स्पष्ट मत

शशांक केतकर वाहतूक कोंडीत अडकला ( Shashank Ketkar )

शशांकने या पोस्टद्वारे टोला लगावला आहे… तो म्हणाला, “वाह वाह… मिरारोड आणि ठाण्याच्यामध्ये लोणावळ्याचा फिल देण्यासाठी ही एक योजना आखलेली आहे. खरंतर मला यांचा हेतू कळत नाहीये. खर्च करून चांगले सिग्नल लावण्यापेक्षा रस्त्यात खड्डे, चुकीच्या मार्गाने येणाऱ्या गाड्या आणि वाहतूक नियमभंग… यामुळे प्रत्यक्षात सिग्नल यंत्रणा एक वेगळंच काम आपण करतेय. ही दूरदृष्टी आपल्याकडे आहे. वाह वाह सिग्नलचा खर्च वाचतो, खड्ड्यांमुळे स्पीडब्रेकरचा खर्च वाचतो. या सगळ्यासाठी किती वेगळी दृष्टी लागते आणि लोकांचा वेळ, जीव हे तर काय फारसं महत्त्वाचं नाहीये. आता सगळे लोक या कोडींमुळे पायी प्रवास करत आहेत. मलाही असंच वाटतंय की, माझी गाडी इथेच पार्क करून चालत जावं म्हणतोय… कारण शूटिंगला वेळेत पोहोचावं लागेल आणि रात्री ९- १० पर्यंत या गाड्या हलतील असं वाटत नाहीये. तेव्हा मी गाडी इथूनच पुन्हा घेऊन जातो…वाह क्या बात है.”

Shashank Ketkar
शशांक केतकरची संतप्त पोस्ट ( Shashank Ketkar )

हेही वाचा : “Be Strong माई”, वर्षा उसगांवकरांच्या ऑनस्क्रीन लेकाची पोस्ट चर्चेत! म्हणाला, “रितेश भाऊ बरोबर क्लास…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शशांकने या प्रकरणासंदर्भात त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर देखील काही पोस्ट देखील शेअर केल्या आहेत. “तासभर मी गाडी बंद करून एकाच ठिकाणी उभा आहे. आता ही सगळी लोक गाड्यांमधून उतरून पायी प्रवास करत आहेत. कारण, पुढे दूरवर वाहतूक कोंडी आहे.” असं अभिनेत्याने ( Shashank Ketkar ) म्हटलं आहे. या पोस्टमध्ये शशांकरने मुंबई पोलीस, ठाणे पोलीस यांच्यासह मुंबई महानगरपालिकेला टॅग केलं आहे. दरम्यान, अभिनेत्याच्या पोस्टवर नेटकऱ्यांसह अनेक मराठी कलाकारांनी देखील मुंबईतील वाहतूक कोंडीबाबत संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.