तुनिषा शर्माच्या आत्महत्येमुळे अभिनेता शिझान खान सध्या चर्चेत आहे. अभिनेत्रीच्या आईने तक्रार दाखल केल्यानंतर शिझानला अटक करण्यात आली आणि सध्या तो पोलीस कोठडीत आहे. शिझानला २८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तुनिषाच्या मृत्यूबद्दल त्याची कसून चौकशी केली जात आहे. तुनिषाने अली बाबा: दास्तान-ए-काबुल शोच्या सेटवर आत्महत्या केली होती. शिझानने ब्रेक अप केल्यामुळे नैराश्यातून तुनिषाने आत्महत्या केल्याचं म्हटलं जातंय.

नुकतंच शिझानच्या बहिणी फलक नाज आणि शफक नाज यांनी याबद्दल वक्तव्य केलं आहे. ‘इंडिया टूडे’च्या वृत्तानुसार त्यांनी एकंदर या प्रकरणामध्ये त्यांना नेमका मनस्ताप कशामुळे होत आहे याविषयी खुलासा केला आहे.

आणखी वाचा : Video: रणबीर-अलियाने केली आठ मजली ‘ड्रीम होम’ची पाहणी; लवकरच लेकीबरोबर राहायला येणार

मीडियाशी संवाद साधताना त्या दोघींनी सांगितलं, “जी जी लोक आमच्याशी संपर्क करू इच्छित आहेत, त्यांच्यासाठी हे स्टेटमेंट आहे. अशा कठीण प्रसंगी आमच्या कुटुंबाला थोडं एकटं सोडा. मीडिया क्षेत्रातील मंडळी सतत आम्हाला फोन करत आहेत, आमच्या घराखाली येऊन थांबले आहेत हे सगळं खूप अस्वस्थ करणारं आहे. भारतीय न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि शिझानही पोलिसांना योग्य ते सहकार्य करत आहे. योग्य वेळ येताच आम्ही यावर भाष्य करू, तूर्तास आमच्या कुटुंबाकडे कसलीही विचारणा करू नका, आम्हाला आमच्या प्रायव्हसीचा पूर्ण अधिकार आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिझान मोहम्मद खानबद्दल अशा वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. शिझान लहान असताना त्याच्यावर लैंगिक अत्याचार झाला होता शिवाय तो अगदी सात वर्षांचा असताना त्याला नैराश्याने ग्रासलं होतं. व्हर्च्युअल टेड टॉकदरम्यान त्याने याबद्दल खुलासा केला होता. त्याने त्याच्या पालकांच्या नातेसंबंधाबद्दल आणि पालकांमधील भांडणं पाहून तो कसा मोठा झाला याबद्दल देखील त्याने खुलासा केला आहे.