अभिनेत्री प्रार्थना बेहेरे ही मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. आतापर्यंत अनेक मालिका आणि चित्रपटांमधून तिने उत्तमोत्तम भूमिका साकारल्या. तर नुकतीच ती उद्योजिका बनली आहे. तिने तिच्या नणंदेबरोबर मिळून साड्यांचा नवीन ब्रँड सुरू केला आहे. तर आता त्यावर अभिनेता श्रेयस तळपदेने प्रतिक्रिया दिली आहे.

श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहेरे यांनी माझी तुझी रेशीमगाठी या मालिकेमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या. ही मालिका सुपरहिट झाली आणि श्रेयस प्रार्थनाच्या जोडीला ही प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. या मालिकेच्या निमित्ताने हे दोघे पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसले आणि त्यांच्यात खूप चांगली मैत्री झाली. तर आता प्रार्थनाच्या नवीन व्यवसायाबद्दल श्रेयसने एक स्टोरी शेअर केली आहे.

आणखी वाचा : “आम्हाला मूल नकोय…,” प्रार्थना बेहेरेने केलं स्पष्ट भाष्य, म्हणाली, “आमच्या घरच्यांना…”

घटस्थापनेच्या दिवशी प्रार्थनाने तिच्या नवीन व्यवसायाची घोषणा करत त्याबद्दल प्रेक्षकांना माहिती दिली. तिने तिची नणंद पल्लवी भिडेबरोबर मिळून साड्यांचा नवा ब्रॅन्ड सुरू केला आहे. ‘वी नारी’ (WeNaari) असं त्यांच्या नवीन ब्रॅन्डचं नाव आहे.  या तिच्या नवीन व्यवसायाबद्दल प्रतिक्रिया देत श्रेयसने एक इन्स्टाग्रामवर स्टोरीवर या ब्रँड संबंधित प्रार्थना आणि पल्लवीचा एक व्हिडिओ शेअर करत लिहिलं, “या नवीन व्यवसायासाठी अभिनंदन मॅडम… हे कलेक्शन आऊटस्टँडिंग आहे.” याबरोबरच यामध्ये त्याने प्रार्थना आणि पल्लवीला टॅग केलं.

हेही वाचा : “माझा नवरा मला मारतो…, “अखेर प्रार्थना बेहेरेने सोडलं मौन, म्हणाली, “मी आणि अभिषेक…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्रेयसने शेअर केलेली ही इन्स्टाग्राम स्टोरी चांगलीच चर्चेत आली आहे. तर श्रेयसची ही स्टोरी रिपोस्ट करत प्रार्थनानेही त्याचे आभार मानले.