तेजश्री प्रधान व राज हंचनाळे यांची प्रमुख भूमिका असलेली ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. ४ सप्टेंबर २०२३पासून सुरू झालेल्या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात अल्पावधीत घर निर्माण केलं आहे. मुक्ता, सागर, सई, सावनी, हर्षवर्धन, मिहिका, मिहिर, इंद्रा, माधवी, पुरुषोत्तम गोखले, जयंत गोखले या सगळ्या पात्रांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळेच मालिका टीआरपीच्या यादीत दुसऱ्या क्रमाकांवर ठाण मांडून आहे. या लोकप्रिय मालिकेचे दिग्दर्शक एका प्रसिद्ध अभिनेत्रीचे पती आहेत, हे तुम्हाला माहितीये का?

‘स्टार प्रवाह’वरील ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचं दिग्दर्शन गिरीश वसईकर करत आहेत. मराठी मालिकाविश्वातील गिरीश वसईकर हे एक नावाजलेलं नाव आहे. त्यांनी यापूर्वी अनेक मराठी मालिकेचं दिग्दर्शन केलं आहे. सध्या टीआरपीमध्ये नंबर वन असलेली मालिका ‘ठरलं तर मग’चेही ते दिग्दर्शक होते. ‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या सुरुवातीला दिग्दर्शनाची धुरा गिरीश वसईकरांनी सांभाळली होती. गिरीश वसईकर यांची पत्नी देखील मराठी मालिकाविश्वात सक्रिय आहे.

हेही वाचा – Video: गायिका आर्या आंबेकरच्या आवाजात ‘दबक्या पावलांनी आली’ गाणं भेटीला, पाहा व्हिडीओ

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या ऐतिहासिक मालिकेमध्ये सोयराबाईंच्या भूमिकेत झळकलेली स्नेहलता वसईकर ही गिरीश वसईकरांची पत्नी आहे. या मालिकेत तिने सोयराबाईंची भूमिका उत्तमरित्या निभावली होती. आजही तिला याच भूमिकेमुळे ओळखतात. स्नेहलताने आजवर मालिका, चित्रपट व वेबसीरिजमध्ये काम केलं आहे. तसंच स्नेहलता ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात झळकली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या अभिनेत्री ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘तुझी माझी जमली जोडी’ या मालिकेत पाहायला मिळत आहे. या मालिकेत तिने भैरवी जहागिरदार ही भूमिका साकारली आहे. याशिवाय महानाट्य ‘शिवपुत्र संभाजी’ यामध्ये ती काम करत आहे. काही दिवसांपूर्वीच या महानाट्याचा संगमनेरमध्ये प्रयोग झाला;ज्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.