मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये स्पृहा जोशीचेही नाव सामील आहे. उत्तम अभिनेत्री आणि संवेदनशील कवयित्री, उत्कृष्ट सूत्रसंचालिका म्हणून तिला ओळखलं जातं. तर सध्या ती ‘लोकमान्य’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. तर आता २०२३ साठी तिने तिचा नवरा वरदबरोबर मिळून एक हटके संकल्प केल्याचं तिने शेअर केलं आहे.

स्पृहा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. विविध पोस्ट, स्टोरीज पोस्ट करत ती तिच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी चाहत्यांशी शेअर करत असते. तर आता तिने नुकतीच एक पोस्ट शेअर केली. या तिने आणि तिच्या नवऱ्याने मिळून दर महिन्याला एक छोटीशी ट्रिप करायची असा संकल्प केल्याचं सांगितलं.

आणखी वाचा : स्पृहा जोशीचा युट्यूब चॅनल हॅक, माहिती देत अभिनेत्री म्हणाली, “आता सगळे व्हिडीओ…”

स्पृहाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले. या फोटोमध्ये ती आणि तिचा नवरा वरद लघाटे दिसत आहेत. ही पोस्ट शेअर करत तिने लिहिलं, “नवीन वर्षाचा संकल्प- आम्ही यावर्षी एकमेकांना दिलेल्या वचनाचा एक भाग म्हणून प्रत्येक महिन्याला एक छोटीशी ट्रीप करायचं ठरवलं आहे. जानेवारी महिन्यात आम्ही गोव्याला गेलो होतो आणि फेब्रुवारी महिन्यात आम्ही जयपूरला गेलो. अशा अनेक अनुभवांची वाट पाहत आहे आणि मला आशा आहे की आम्ही हा संकल्प वर्षभर पाळू.”

हेही वाचा : “अभिनेत्री होण्यासाठीचे गुण माझ्यात नाहीत…” स्पृहा जोशीच्या पोस्टने वेधलं लक्ष

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तिने ही पोस्ट शेअर करताच तिच्या चाहत्यांनी यावर विविध प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. अनेकांनी त्यांच्या या हटके संकल्पचा खूप कौतुक केलं. एका नेटकऱ्याने लिहिलं, “असा संकल्प पाहिजे म्हणजे फिरण्याचा बहाणा नाही. तर दुसरा नेटकरी म्हणाला, “खूप छान संकल्प आहे.” तर एका नेटकऱ्याने लिहिलं, “पैसा असल्यावर काय होऊ शकत नाही!” आता स्पृहाची ही पोस्ट खूप चर्चेत आली आहे.