Star Pravah Aboli Serial Off Air : छोट्या पडद्यावर येत्या काही महिन्यांत अनेक नवनवीन मालिका सुरू होणार आहेत. २७ ऑक्टोबरपासून ‘स्टार प्रवाह’वर सुद्धा महत्त्वाचे बदल करण्यात येणार आहेत. या वाहिनीवर ‘काजळमाया’ ही नवीन हॉरर मालिका सुरू होणार आहे. या मालिकेच्या प्रसारणाची वेळ साडेदहा वाजताची आहे. यामुळे ‘तू ही रे माझा मितवा’ ही मालिका २७ तारखेपासून रात्री आठ वाजता प्रसारित केली जाणार आहे.
तर, ‘कोण होतीस तू, काय झालीस तू!’ ही यश-कावेरीची मालिका रात्री ११ वाजता प्रक्षेपित केली जाईल. सध्या रात्री अकरा वाजता ‘अबोली’ मालिका ऑन एअर होते. ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. काही दिवसांपूर्वीच ‘अबोली’चं शूटिंग पूर्ण झालं आणि त्यानंतर या सगळ्या कलाकारांनी मिळून Wrap Up पार्टी केली.
२७ ऑक्टोबरपासून स्टार प्रवाहवर काय बदल होणार?
१. तू ही रे माझा मितवा – रात्री ८ वाजता
२. कोण होतीस तू, काय झालीस तू! – रात्री ११ वाजता
३. काजळमाया ( नवी मालिका ) – रात्री १०:३० वाजता
४. अबोली – समाप्त
‘या’ दिवशी प्रसारित होणार ‘अबोली’चा शेवटचा भाग
‘अबोली’ मालिका स्टार प्रवाहवर २३ नोव्हेंबर २०२१ रोजी सुरू झाली होती. आता जवळपास ४ वर्षांनी ही सिरियल सर्वांचा निरोप घेणार आहे. यामध्ये प्रेक्षकांना अबोली-अंकुशची हटके लव्हस्टोरी पाहायला मिळाली. येत्या २६ ऑक्टोबरला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे.
२६ ऑक्टोबर रात्री ११ वाजता अबोली-अंकुशच्या मालिकेचा अंतिम भाग प्रसारित होऊन या सिरियलचा शेवट होणार आहे. या मालिकेने जवळपास ४ वर्षे रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. विशेष म्हणजे, रात्री उशिराच्या स्लॉटला सुद्धा ‘अबोली’ मालिकेला खूप चांगला टीआरपी मिळत होता. यामध्ये गौरी कुलकर्णी आणि सचित पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
दरम्यान, ‘अबोली’ मालिकेचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे प्रेक्षक सुद्धा या मालिकेला प्रचंड मिस करणार आहेत; तशा कमेंट्स देखील अंतिम भागाच्या प्रोमोवर आल्या आहेत. गौरी आणि सचित यांच्यासह रेशम टिपणीस, रसिका धामणकर, माधव देवचक्के, कोमल कुंभार, मयुरी वाघ असे दमदार कलाकार या मालिकेचा भाग होते.