इन्फोसिस फाऊंडेशनच्या संस्थापिका, समाजसेविका, लेखिका आणि शिक्षिका अशी सुधा मूर्तींची ओळख आहे. त्यांच्या कार्याबरोबरच त्या त्यांच्या साधेपणा आणि नम्रपणामुळेही नेहमीच लक्ष वेधून घेतात. या त्यांच्या स्वभावामुळे आणि त्यांच्या कार्यामुळे त्या अनेकांसाठी आदर्श आहेत. नुकतीच त्यांनी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी लावली. या वेळी त्यांनी शाहरुख खानबद्दल मोठं वक्तव्य केलं.

सुधा मूर्ती ‘द कपिल शर्मा शो’च्या नुकत्याच झालेल्या भागामध्ये उपस्थित होत्या. या वेळी ‘द एलिफेंट व्हिस्परर्स’ डॉक्युमेंट्रीच्या निर्मात्या गुनीत मोंगा आणि अभिनेत्री रवीना टंडन यांनीही या कार्यक्रमात हजेरी लावली. या वेळी सुधा मूर्ती यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला, त्यांना आलेले अनुभव सांगितले, काही गमतीशीर किस्सेही शेअर केले. त्यांच्या चित्रपट प्रेमाविषयी बोलताना त्यांनी दिलीप कुमार व शाहरुख खान यांचा उल्लेख केला.

आणखी वाचा : भव्य खोल्या, प्रायव्हेट मूव्ही थिएटर आणि…; ‘इतक्या’ कोटींचा आहे शाहरुख खानचा आलिशान मन्नत बंगला

त्या म्हणाल्या, “मी खूप चित्रपट पाहिले आहेत. मला आठवतं, जेव्हा मी पुण्यात होते तेव्हा कोणीतरी माझ्याशी रोज चित्रपट बघण्याची पैज लावली होती. त्या वेळी मी ३६५ दिवस रोज एक चित्रपट पाहिला.” यानंतर जुन्या आठवणींना उजाळा देत त्या म्हणाल्या, “मी तरुण होते तेव्हा दिलीप कुमार माझे आवडते अभिनेते होते. ते अत्यंत भाव ओतून प्रत्येक भूमिका साकाराचे, तसं इतर कोणीही केलं नाही. तसं काम फक्त शाहरुख खानच करू शकतो.”

हेही वाचा : ‘बाजीगर’ चित्रपटात शाहरुख खानच्या जागी दिसला असता ‘हा’ अभिनेता, पण…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे त्या म्हणाल्या, “शाहरुख खानचा ‘वीर जारा’ हा चित्रपट पाहिल्यावर मी माझ्या मुलीला सांगितलं होतं, जर दिलीप कुमार आज तरुण असते तर तेच या चित्रपटात असते. आता शाहरुख खानने त्यांची जागा घेतली आहे आणि फक्त तोच तसं काम करू शकतो.” आता त्यांची ‘द कपिल शर्मा शो’मधील ही मुलाखत खूप चर्चेत आली आहे.