‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेने लोकप्रियतेची एक वेगळीच उंची गाठली आहे. २०२०पासून सुरू झालेली ही मालिका प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहे. या मालिकेतील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं आहे. शिवाय ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’मधील कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मग मालिकेतील गौरी असो किंवा शालिनी प्रत्येक पात्राने प्रेक्षकांना आपलंस केलं आहे. त्यामुळे मालिकेवर अजूनही प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. आज शालिनी म्हणजे अभिनेत्री माधवी निमकरचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आज तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतं आहे. अशातच तिने स्वतःच्या वाढदिवसानिमित्ताने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेत्री माधवी निमकर आज वाढदिवसानिमित्ताने आपल्या आई-वडिलांचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत माधवीने आई-वडिलांचे आभार मानले आहेत. “आई-बाबा थँक्यू, लव्ह यू बोथ”, असं तिने या व्हिडीओला कॅप्शन लिहिलं आहे. या व्हिडीओत माधवीचे आई-वडील एकमेकांशी गप्पा मारताना दिसत आहेत. अभिनेत्रीच्या आई-वडिलांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – अभिमानास्पद! ‘कान फिल्म फेस्टिव्हल २०२४’मध्ये सिद्धार्थ जाधवच्या ‘या’ मराठी चित्रपटाचं स्क्रिनिंग, पोस्ट करत म्हणाला…

हेही वाचा – Video: ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ मालिकेत जबरदस्त वळण, खोट्या अर्जुन मागचा मास्टमाईंड आहे ‘हा’ चेहरा

अभिनेत्री माधवी निमकरने शेअर केलेल्या या व्हिडीओवर तिच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेचं पहिलं पर्व संपल्यानंतर दुसऱ्या पर्वात शालिनी म्हणजे अभिनेत्री माधवी निमकर दिसणार की नाही? असा मोठा प्रश्न पडला होता. पण मालिकेच्या दुसऱ्या पर्वात शालिनी शिर्के-पाटीलची जबरदस्त एन्ट्री झाली आणि मालिकेला एक नवं वळण आलं.

हेही वाचा – रुग्णालयात दाखल राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल माहिती; म्हणाली, “गर्भाशयात ट्यूमर असून…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माधवीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेपूर्वी तिने बऱ्याच मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे. विविधांगी भूमिका साकारून तिने मराठी सिनेसृष्टीत स्वतःची वेगळी छाप उमटवली आहे. ‘शेर शिवराज’, ‘पावनखिंड’, ‘संघर्ष’, ‘सगळं करून भागलं’, ‘असा मी तसा मी’ अशा अनेक चित्रपटात माधवी महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती.