‘सुंदरा मनामध्ये भरली’ या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेत अभिनेत्री अक्षया नाईकने ‘लतिका’ ही भूमिका प्रमुख साकारली होती. आता तिला घरोघरी लतिका व सुंदरा या दोन ऑनस्क्रीन नावांनी देखील ओळखलं जातं. सध्या अभिनेत्री एका नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. याशिवाय ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. अक्षया नवनवीन फोटो, व्हिडीओ शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहते. अशावेळी अनेकदा तिच्या फोटोंवर काही लोकांकडून नकारात्मक कमेंट्स केल्या जातात. अशा सर्व नेटकऱ्यांना अक्षयाने स्पष्ट उत्तर दिलं आहे.

अक्षया नाईकने नुकत्याच शेअर केलेल्या एका फोटोवर एका युजरने, “मालिकेत या खूप साजूक असतात आणि इकडे पैशांसाठी काय काय करतात” अशी कमेंट केली होती. यावर अभिनेत्रीने देखील स्पष्ट शब्दात उत्तर देत या युजरला सुनावलं आहे.

हेही वाचा : रितेश विलासराव देशमुख : मुख्यमंत्री वडिलांचा सल्ला मानला अन् लातूरच्या हिरोने महाराष्ट्राला ‘वेड’ लावलं

अक्षया म्हणाली, “तुमची विचार करण्याची क्षमता पाहून मला तुमची दया आली. पैसे मालिका करताना मिळत नाही असं वाटतं का तुम्हाला? समोरच्या व्यक्तीला ट्रोल करताना, आधी काहीतरी ठोस मुद्दा घ्या आणि मग बोला…असो जरा स्वत:ची काळजी घ्या” अभिनेत्रीने अशाप्रकारे तिच्या पोस्टवर नकारात्मक कमेंट करणाऱ्या सगळ्याच नेटकऱ्यांना सुनावलं आहे.

akshaya naik
अक्षया नाईक

हेही वाचा : चित्रपटनिर्मिती मराठीतच!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अक्षया नाईकच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर मालिका संपल्यावर नुकतंच तिने रंगभूमीवर ‘चुकभूल द्यावी घ्यावी’ या नाटकातून पदार्पण केलं. याशिवाय अभिनेत्रीने तिच्या बहिणीच्या साथीने नुकताच गोव्यात स्वत:चा नवीन व्यवसाय सुरू केला आहे. आता येत्या काळात लाडक्या अक्षयाला आणखी नवनवीन भूमिकांमध्ये पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.