‘MTV’ वरील ‘Splitsvilla’ या कार्यक्रमाची तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ आहे. गेल्या महिन्यातच या शोचा १४ वा सीझनसुद्धा सुरू झाला असून यालाही नेहमीप्रमाणेच उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या शोच्या ७ व्या सीझनपासून अभिनेत्री सनी लिओनी सूत्रसंचालक म्हणून काम करत आहे. सनी आणि रणविजय यांची ही जोडी चांगलीच गाजली. केवळ या दोघांसाठी हा शो बघणारे प्रेक्षकसुद्धा आहेत.

नुकतंच ‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सनी लिओनीने या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनासाठी होकार का दिला याबद्दल खुलासा केला आहे. बॉलिवूडमध्ये बस्तान बसवल्यानंतर सनीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. तिच्या खासगी आयुष्याबद्दल चर्चा होऊ लागल्या, पण Splitsvilla ने तिच्या या लोकप्रियतेत आणखी भर घातली. याबद्दलच तिने या मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे.

आणखी वाचा : ‘कांतारा’ आणि ‘तुंबाड’ या चित्रपटांची तुलना योग्य की अयोग्य? वाचा नेटकरी काय म्हणतात

सनी म्हणाली, “लहानपणापासूनच मला व्हिडिओ जॉकी व्हायची इच्छा होती. शिवाय मी MTV बघतच लहानाची मोठी झाले. त्यामुळे या शोची जेव्हा मला ऑफर आली तेव्हा मी यासाठी प्रचंड उत्सुक होते आणि म्हणूनच मी क्षणाचाही विलंब न करता याला होकार दिला. एकदा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केल्यावर मला ही संकल्पना प्रचंड आवडली. कमी वयातील तरुण या मंचावर येऊन आयुष्यातील बऱ्याच कठीण गोष्टींचा सामना करता हे पाहून मला खूपच, कठीण निर्णय घ्यायला शिकतात हे मी फार जवळून अनुभवलं आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मध्यंतरी सनीच्या आयुष्यावर बेतलेली ‘करनजीत कौर – द अनटोल्ड स्टोरी’ ही वेबसिरीजही चांगलीच गाजली. यामध्ये सनीनेच मुख्य भूमिका साकारली होती. याबरोबरच सनी बऱ्याच बॉलिवूड चित्रपटांमध्येसुद्धा झळकली आहे. याबरोबरच सनी तिच्या खासगी आयुष्यामुळे आणि तिच्या मुलांमुळे कायम चर्चेत असते.