Swanandi Tikekar and Ashish Kulkarni Wedding : ‘दिल दोस्ती दुनियादारी’ फेम अभिनेत्री स्वानंदी टिकेकर व प्रसिद्ध गायक आशिष कुलकर्णी हे दोघंही नुकतेच (२५ डिसेंबर २०२३) लग्नबंधनात अडकले आहेत. गेल्या काही दिवसांपासून कलाविश्वात या दोघांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू होती. स्वानंदी-आशिषच्या हळदी, मेहंदी व संगीत सोहळ्यातील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

स्वानंदी टिकेकर-आशिष कुलकर्णी या दोघांचा साखरपुडा जुलै महिन्यात पार पडल्यावर त्यांचे चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आज ही लोकप्रिय जोडी लग्नबंधनात अडकली आहे. अभिनेत्रीने लग्नातील सर्व फोटोंना “आनंदी…” हा हॅशटॅग वापरला आहे. आशिष-स्वानंदी या दोघांच्या नावातील काही अक्षरं एकत्र करून ‘आनंदी’ हा नवीन हॅशटॅग तयार करण्यात आला आहे.

हेही वाचा : Video: “असा कसा बाई मला तुझा रंग लागला…” म्हणत मराठमोळ्या अभिनेत्रीने मेहंदीचा व्हिडीओ केला शेअर, लवकरच अडकणार लग्नबंधनात

स्वानंदीने लग्नाच्या फोटोंना “मिस्टर अँड मिसेस कुलकर्णी आनंदी” असं कॅप्शन दिलं आहे. लग्न लागताना स्वानंदीने पिवळ्या रंगाची पैठणी साडी नेसल्याचं फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. तसेच आशिषने लग्नात ऑफ व्हाइट रंगाची शेरवानी परिधान केली होती.

दरम्यान, सुव्रत जोशी, निपुण धर्माधिकारी, सखी गोखले, जुईली जोगळेकर अशा बऱ्याच सिनेविश्वातील कलाकारांनी स्वानंदी-आशिषच्या लग्नाचा उपस्थिती लावली होती.

हेही वाचा : गौतमी पाठोपाठ ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, हर्षदा खानविलकरांनी शेअर केला फोटो

View this post on Instagram

A post shared by Ashish Kulkarni (@ashishkulkarni.music)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्वानंदीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर छोट्या पडद्यावरील ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेमुळे ती घराघरांत पोहोचली. त्यानंतर तिने ‘अस्सं माहेर नको गं बाई’, “अगं अगं सुनबाई…” या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. याशिवाय आशिष कुलकर्णीबद्दल सांगायचं झालं, तर तो उत्तम गायक आणि गीतकार आहे. सध्या मराठी कलाविश्वातून या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.