Tejashri Pradhan New Serial Vin Doghantali Hi Tutena Muhurta : ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यावर तेजश्री प्रधानच्या कमबॅकची प्रेक्षक गेल्या काही महिन्यांपासून आतुरतेने वाट पाहत होते. अखेर ‘झी मराठी’च्या ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेतून तेजश्री पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर मुख्य भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाली आहे. या मालिकेत लोकप्रिय अभिनेता सुबोध भावे प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. या मालिकेच्या प्रसारणाची तारीख अद्याप वाहिनीने जाहीर केलेली नाही. मात्र, तेजश्रीचं कमबॅक असल्याने या मालिकेला प्राइम टाइम मिळण्याची दाट शक्यता आहे.

‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत तेजश्री ‘स्वानंदी’ तर, सुबोध ‘समर’ ही भूमिका साकारताना दिसेल. नुकताच या मालिकेचा मुहूर्त पार पडला. यावेळी तेजश्रीने सेटवरून खास फोटो शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत.

तेजश्री प्रधानने शेअर केलेल्या फोटोमध्ये अभिनेत्री देवाचे आशीर्वाद घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेत्री या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिते, “गणपती बाप्पा मोरया! तुम्हा सर्वांच्या साक्षीने सुरुवात करतेय…मायबाप प्रेक्षकहो… आपल्यातली ही वीण कायम घट्ट राहूदेत…”

नव्या मालिकेचं नाव आहे खूपच खास…

तेजश्रीच्या नव्या मालिकेचं नाव ‘झी मराठी’ची जुनी मालिका ‘खुलता कळी खुलेना’च्या शीर्षक गीतावरून ठेवण्यात आलं आहे. “हीच प्रीती, हीच भीती…वीण दोघांतली ही तुटेना” या ओळी ‘खुलता कळी खुलेना’च्या शीर्षक गीतामध्ये होत्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Vin Doghantali Hi Tutena Muhurta
तेजश्री प्रधानच्या नव्या मालिकेचा पार पडला मुहूर्त ( Vin Doghantali Hi Tutena Muhurta )

दरम्यान, ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या नव्या मालिकेची वेळ आणि प्रदर्शनाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येतील. तेजश्री आणि सुबोधच्या या मालिकेला प्रेक्षक कसा प्रतिसाद देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या दोघांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत सर्वांवर भारी पडेल असा अंदाज बांधला जात आहे.