अभिनेत्री तेजश्री प्रधान व राज हंचनाळे यांची प्रमुख भूमिका असलेली ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत रंगत आली आहे. मुक्ता-सागरच्या लग्नामुळे मालिकेला नवं वळणं आलं आहे. सतत टोकाचे वाद होणारे गोखले-कोळी कुटुंब या लग्नामुळे एकत्र आले आहेत. त्यामुळे सध्या दोन्ही कुटुंबात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी मुक्ता-सागर यांचा साखरपुडा पार पडला. त्यानंतर मेहंदी समारंभ झाला. सध्या संगीत समारंभ सुरू आहे. या समारंभासाठी खास स्टार परिवारातील सदस्यांनी हजेरी लावली आहे. संगीत सोहळ्याच्या सुरुवातीला ‘अबोली’ मालिकेतील अबोली आणि ‘लग्नाची बेडी’मधील मधुराणीने कथ्थक डान्स केला. त्यानंतर मुक्ताच्या बाबांनी तिच्यासाठी गाणं गायलं आणि आई मुक्ताविषयी भरभरून बोलली. यामुळे सर्वजण भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.

हेही वाचा – Premachi Goshta: लग्नातील राज हंचनाळेचा कोळी लूक पाहून तेजश्री प्रधानची प्रतिक्रिया, म्हणाली, “तू कसला…”

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या कालच्या भागात कोळी कुटुंबामुळे चांगलीच रंगत आली. कोळी कुटुंबाने संगीत समारंभ अक्षरशः हायजॅक केला. कोमल, स्वाती, लकीचा जबरदस्त डान्स झाला. त्यानंतर सागरच्या आई-वडिलांचा म्हणजे इंद्रा-जयंत यांचा सरप्राईज डान्स पाहायला मिळाला. यावेळी त्यांनी मुक्ताच्या आई-वडिलांसारखा पेहराव करून त्यांची हुबेहुब नक्कल करत डान्स केला. ज्यामुळे संगीत समारंभाला अजूनच मज्जा आली. आता संगीत, हळद या समारंभानंतर मुक्ता-सागरचा सप्तपदीचा सोहळा पाहायला मिळणार आहे. सध्या सोशल मीडियावर मुक्ता-सागरचा लग्नातला लूक चांगलाच व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये लग्नासाठी खास सागर कोळी पेहरावात दिसत आहे. तर मुक्ता पिवळ्या रंगाच्या नऊवारी साडीत पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – Video: ‘रात्रीस खेळ चाले’मधल्या माईची ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत एन्ट्री, झळकणार ‘या’ भूमिकेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नुकताच मुक्ता-सागरने लग्नानिमित्ताने ‘अल्ट्रा मराठी बझ’ या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलशी संवाद साधला. यावेळी दोघांनी एकमेकांसाठी भन्नाट उखाणे घेतले. सागर मुक्तासाठी उखाणा घेत म्हणाला, “नौका घेऊन निघालो दर्याकाठी मुक्ताबरोबर लग्न करतोय फक्त सईसाठी.” तर मुक्ता सागरसाठी उखाणा घेत म्हणाली, “भाजीत भाजी मेथीची सई माझ्या प्रीतीची.”