तेजश्री प्रधान व राज हंचनाळे यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेला एक वेगळं वळण आलं आहे. नुकत्यात सुरू झालेल्या मुक्ता-सागरच्या प्रेमाच्या गोष्टीमध्ये सावनी आग लावते. आदित्यचा वापर करून सावनी मुक्ता-सागरमध्ये फूट पाडते. पण ही फूट लवकरच संपुष्टात येणार असून सागर मुक्ताची माफी मागताना पाहायला मिळणार आहे.

होळीच्या दिवशी सागर मुक्ताला सगळ्यांसमोर प्रपोज करतो. पण त्याच दिवशी आदित्यच्या प्रेमाखातर त्याला सागर मुक्ताबरोबर सर्व नाटक करत असल्याचं सांगतो. हे ऐकून मुक्ताला धक्का बसतो. मुक्ता सागरजवळ जाते. तेव्हा सागर तिला समजावण्याचा प्रयत्न करतो. पण संतापलेली मुक्ता सागरच्या कानशिलात लावते. “आपल्या दोघांमध्ये कोणतंच प्रेम नव्हतं, आपल्या नात्याचा पाया तडजोड होता. आता आपलं नातं हे फक्त सईचे आई-बाबा असेल, त्यापलीकडे आपला संबंध नसेल”, असं रागाच्या भरात मुक्ता बोलते. तेव्हा सागर तिला खूप समजवण्याचा प्रयत्न करतो. पण मुक्ता काही ऐकत नाही. मुक्ता-सागरमधलं भांडणं पाहून सावनीला खूप आनंद होतो. मात्र आता लवकरच सागर मुक्ताची माफी मागताना दिसणार आहे. याचा व्हिडीओ समोर आला आहे.

हेही वाचा – Video: सुपरस्टार राम चरणच्या लेकीची ११ महिन्यांनंतर दिसली पहिली झलक, व्हिडीओ व्हायरल

या व्हिडीओत, सागर हात जोडून मुक्ताची माफी मागताना पाहायला मिळत आहे. पण मुक्ता काहीच बोलत नाही. शेवटी गुडघ्यावर बसून कान पकडून सागर मुक्ताची माफी मागतो. “मला प्लीज माफ करा, आपण नव्याने सुरुवात करुया?”, असं बोलून तो मुक्तासाठी हात पुढे करतो. पण तरीही मुक्ता काही सागरला माफ करत नाही. त्यामुळे आता मुक्ता-सागरमधलं प्रेमाचं नातं पुन्हा फुलणार की नाही? हे पाहणं उत्सुकतेच असणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – “मला त्याचं जाणं…”, ‘आई कुठे काय करते’मधील आशुतोषच्या एक्झिटने प्रसिद्ध अभिनेत्यालाही झालं दुःख, म्हणाला…

दरम्यान, सध्या ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. ऑनलाइन टीआरपीच्या यादीत मालिका गेल्या काही आठवड्यापासून पहिल्या स्थानावर आहे.