Tharala Tar Mag Fame Jui Gadkari : ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री जुई गडकरी एका नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शारदीय नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी अभिनेत्रीने सर्व चाहत्यांसह ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. ही खास गोष्ट नेमकी काय आहे जाणून घेऊयात…

‘ठरलं तर मग’ या मालिकेमुळे अभिनेत्री जुई गडकरी घराघरांत लोकप्रिय झाली आहे. या मालिकेत तिने साकारलेल्या सायलीच्या भूमिकेने अल्पावधीतच प्रत्येकाचं मन जिंकून घेतलं आहे. गेली अनेक वर्षे विविध मालिका व शोजमधून आपण जुईला अभिनेत्रीच्या रुपात पाहत आलो आहोत. पण, आता अभिनेत्री ‘लेखिका’ म्हणून पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे.

‘कॉकटेल स्टुडिओज’च्या एका नव्या वेबसीरिजची लेखिका म्हणून जुईने जबाबदारी सांभाळली आहे. आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर या वेब सीरिजची घोषणा करण्यात आली आहे. याचा फोटो शेअर करत जुईने याला “लवकरच… लेखिका म्हणून एक नवीन सुरुवात” असं कॅप्शन दिलं आहे. तसेच या नव्या वेबसीरिजचा मुहूर्त पार पडल्यावर जुईने या प्रोजेक्टसाठी कृतज्ञता देखील व्यक्त केली आहे.

लेखिका म्हणून नवीन सुरुवात करणाऱ्या जुई गडकरीला नेटकऱ्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. आता ही वेबसीरिज केव्हा प्रदर्शित होणार याची माहिती लवकरच अभिनेत्री सोशल मीडियावर शेअर करेल.

Tharala Tar Mag Fame Jui Gadkari writer
Tharala Tar Mag Fame Jui Gadkari ( जुई गडकरीची पोस्ट )

दरम्यान, जुई गडकरीबद्दल सांगायचं झालं, तर ‘ठरलं तर मग’ मालिकेत ती गेली अडीच वर्षे प्रमुख भूमिका साकारत आहे. यामध्ये तिच्यासह लोकप्रिय अभिनेता अमित भानुशाली मुख्य भूमिका साकारत आहे. ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत सुद्धा कायम आघाडीवर असते. आजवरच्या करिअरमध्ये जुईने ‘पुढचं पाऊल’, ‘वर्तुळ’, ‘श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी’ अशा लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.