‘ठरलं तर मग’ या छोट्या पडद्यावरील मालिकेत नुकतीच एका नव्या अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. ‘हे मन बावरे’, ‘बॉस माझी लाडाची’ या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेल्या माधवी जुवेकरने ‘ठरलं तर मग’ मालिकेत जोगतीणीच्या रुपात एन्ट्री घेतली आहे. मालिकेत सध्या नवरात्रौत्सवाचा सीक्वेन्स सुरू आहे. याशिवाय सुभेदारांच्या घरात जोगतीणीचं आगमन झालं आहे. मालिकेच्या आगामी भागात काय होणार? जाणून घेऊयात…

हेही वाचा : “हा पुरस्कार तुमचा आहे”, ‘एकदा काय झालं’साठी सलील कुलकर्णींना राष्ट्रीय पुरस्कार, ‘या’ दोन व्यक्तींना दिलं श्रेय

नवरात्री उत्सवानिमित्त घटस्थापना झाल्यावर सुभेदारांच्या घरात जोगतीण येते आणि याठिकाणी उभा असलेला प्रत्येक मनुष्य नाटक करत असल्याचं सांगते. पुढे सायली या जोगतीणीचा मनोभावे आदरसत्कार करून देवीची पूजा करते. यावेळी जोगतीण सायलीला खास आशीर्वाद देते. ‘ठरलं तर मग’ मालिकेतील प्रिया, अस्मिता, महिमत, नागराज, साक्षी शिखरे हे सगळे मिळून सायली-अर्जुन विरुद्ध कायम कारस्थान करत असतात. प्रिया आणि अस्मिता दोघी मिळून कारस्थानं रचत असल्याचा अंदाज कुठे ना कुठे सायली-अर्जुनला देखील असतो. त्यामुळे आपल्या मनातील व्यथा सायली जोगतीणीसमोर मांडते.

हेही वाचा : “डोळा अन् अर्धा चेहरा सुजला”, ‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम अभिनेत्याची अमेरिकेत झाली ‘अशी’ अवस्था, नेमकं काय घडलं?

जोगतीण सायलीला आशीर्वाद देताना म्हणते, “काळजी करू नकोस सायली…तुला एका मोठ्या अग्निदिव्याला तोंड द्यावं लागतंय. पण, तुझ्यात एवढं पावित्र्य आहे की, कोणतीही वाईट गोष्ट तुझ्या आजूबाजूला फिरकू शकणार नाही. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील.” यावर सायली जोगतीणीला आमचे मधूभाऊ सुटतील का? असा प्रश्न विचारत असल्याचं नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’चा सीक्वल येणार? फरहान अख्तरच्या इंस्टाग्राम पोस्टने वेधलं लक्ष; हृतिक व अभयनेही केली कॉमेंट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सायलीने विचारलेल्या प्रश्नावर जोगतीण काय उत्तर देणार? अर्जुन आणि सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं नातं भविष्यात काय वळणं घेणार? याचा उलगडा आगामी भागांमध्ये केला जाणार आहे. दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षक कौतुकाचा वर्षाव करत असतात. यामध्ये जुई गडकरी, अमित भानुशाली, प्रियांका दिघे, प्रिया तेंडुलकर, मोनिका दबडे, केतकी पालव या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.